इंगोले यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय सेवा योजना शिबिर समारोपीय कार्यक्रमचंद्रपूर : रोखरहित व्यवहारामुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रोखरहित व्यवहार करावा, असे आवाहन प्रा.इंगोले यांनी केले.येथील सरदार पटेल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे गोंडवाना विद्यापीठाचा विद्यापीठस्तरीय व महाविद्यालयीन विशेष शिबिर विसापूर ता. बल्लारपूर येथे पार पडले. या शिबिराच्या समारोपीय सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. आर.पी. इंगोले यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिलीप जयस्वाल, डॉ. जयेश चक्रवर्ती, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. नरेश मडावी, उपसरपंच सुनिल रोंगे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. उषा खंडाळे, प्रा. कुलदीप गौंड आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. आर.पी. इंगोले यांनी शिबिर काळात गावकरी व स्वयंसेवकांसाठी, हिमोग्लोबीन, शुगर, ब्लडप्रेशर चाचणी शिबिराचे आयोजन केल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या फायद्याविषयी मार्गदर्शन केले.शिबिर काळात स्वयंसेवकांनी विसापूर परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. त्याच्या समस्या जाणून त्याचे निराकरणाचा प्रयत्न केला. विहीरीला पाणी कमी पडत असल्यामुळे विसापूर गावच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. मात्र शिबिराथ्यानी श्रमसंस्काराच्या माध्यमातून वर्धा नदीवर बांधलेल्या मातीच्या बंधाऱ्यामुळे विसापूर गावच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कमी झाली. त्यामुळे उपसरपंच रोंगे यांनी सर्वांचे कौतुक केले.यावेळी प्रा. कुलदीप गौंड यांनी स्वच्छ आणि रोखरहित समाज या विषयावर, डॉ. योगेश दुधपचारे यानी स्वच्छतेविषयी तर व व्यक्तिमत्व विकासावर डॉ. शाम धोपटे, मद्यपान, तंबाखु आणि मादकद्रव्य मुक्त समाज या विषयावर डॉ. मंगेश गुलवाडे यांनी मार्गदर्शन केले.सदर शिबिर दरम्यान नृत्य, गायन, नाटक, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले.. समारोपीय सोहळ्याचे संचालन डॉ. शरयु पोतनुरवार व आभार डॉ. उषा खंडाळे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. राजकुमार बिरादार, प्रा. संजय गर्गेलवार, दशरथ कामतवार, विणा दानव, विसापूर ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
रोखरहित व्यवहारामुळे भ्रष्टाचाराला आळा
By admin | Updated: February 18, 2017 00:43 IST