शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य नागरिकांनी चीनविरोधात लढा उभारला पाहिजे -गोविंदाचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:42 IST

भारतातील सामान्य नागरिकांनी चीनविरोधात सामाजिक लढा उभारला पाहिजे, व चिनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे,

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतातील सामान्य नागरिकांनी चीनविरोधात सामाजिक लढा उभारला पाहिजे, व चिनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वाभिमानी आंदोलनाचे संस्थापक, संरक्षक के. एन. गोविंदाचार्य यांनी केले.चंद्रपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वदेशी जागरण मंचाचे प्रमुख प्रा. अजय पत्की, राष्टÑीय संयोजक पवनकुमार श्रीवास्तव, राष्टÑीय संघटन मंत्री बसवराज पाटील, युवा नेता सुरक्षा सेल प्रमुख अभिमन्यू कोहाड, सहसंयोजक राजश्री चौधरी, राष्टÑीय मंत्री, प्रदीप नागपुरकर, भुला महाजन, चंद्रपूर सामाजिक कार्यकर्ते रविंद्र तिराणीक आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते तसचे विदर्भ प्रचारक भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनाचे प्रमुख रवींद्र तिराणिक म्हणाले, चीनसारख्या राष्टÑाशी सीमेवर आपले सैन्य दोन हात करीत आहे. त्यांच्या जोडीने नागरिकांनीही चीन विरोधात लढ्यात सहभागी झाले पाहिजे, व चीनला धडा शिकवला पाहिजे. असे ते म्हणाले.यावेळी चिनी मालाची होळी करण्यात आली. त्यानंतर राष्टÑीय स्वाभीमान आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना गोविंदाचार्य म्हणाले, कोणत्याही देशाची ताकद ही त्या देशातील नागरिकांच्या व्यक्तिमत्वावर ठरते. देशातील नागरिक एकत्रित आणि ताकदवान असतील. तर देश ताकदवान राहतो. चीनचा सर्वकष अभ्यास करुन चिनविरोधी धोरणासाठी सामाजिक रणनिती आखणे आवश्यक आहे. सीमास्तरावर आयुधांचा मदतीने लढाई करता येईल मात्र, सामाजिक स्तरावरील लढाईसाठी सामाजाची एकता आवश्यक आहे. भारतातील सामान्य नागरीकांनी सैन्यासोबत सामाजिक लढा दिला तर चीनला देखील आपण डोईजड होऊ शकतो. चीनचा वेग आहे. तर भारताकडे क्षमता आहे. कोणत्याही स्पर्धेत टिकण्यासाठी वेग नाही, तर क्षमतेची गरज असते. हिच क्षमता टिकवून भारताला चीनविरोधी लढा द्यायचा आहे. असे ते म्हणाले.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन बसवराज पाटील प्रास्ताविक अभिमन्यू कोहाड तर उपस्थिताचे आभार पवनकुमार श्रिवास्तव यांनी मानले. यावेळी अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.