शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

विविध विषयांवर आमसभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : अनेक दिवसानंतर झालेली महानगरपालिकेची आमसभा आज विविध मुद्यांवरून चांगलीच वादळी ठरली. अनेक विषयांवर सत्ताधारी ...

ठळक मुद्देएका तासातच सभा गुंडाळली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेक दिवसानंतर झालेली महानगरपालिकेची आमसभा आज विविध मुद्यांवरून चांगलीच वादळी ठरली. अनेक विषयांवर सत्ताधारी व विरोधी पक्षात वादंग उठला. मात्र कोणत्याही विषयावर विस्तृत चर्चा न करता महापौरांनी अनेक प्रस्तावांना हिरवी झेंडी दाखविली. केवळ एका तासातच आणि वादंगात ही आमसभा गुंडाळण्यात आली.चंद्रपूर महानगरपालिकेची आमसभा आज दुपारी १ वाजता मनपाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या प्रारंभी नवनिर्वाचित नगरसेवक कलावती यादव व प्रदीप किरमे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर आजच सेवानिवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांचा महापौर अंजली घोटेकर यांनी सत्कार केला. फेन इंडियाच्या वतीने विश्वातले सर्वात लोकप्रिय मंत्री म्हणून निवड झालेले सुधीर मुनगंटीवार व आपल्या कार्याने मनपाला आंतराराष्टÑीय प्रसिध्दी मिळवून देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव सर्वानुमते पारित करण्यात आला.त्यानंतर मागील सभेतील वडगाव येथील शेती नान कृषक करण्याचा विषय पुन्हा चर्चेसाठी आला. त्याला नगरसेवक देवेंद्र बेले, नंदू नागरकर, राहुल घोटेकर, सुरेश महाकूळकर, अशोक नागापुरे, कुशल पुगलिया यांनी विरोध दर्शविला. यावर सभागृहात चांगलच गदारोळ झाला. त्यानंतर मागील सभेतील प्रस्ताव क्रमांक ९४ म्हणजे पार्कसाठी आरक्षित असलेल्या भूखंडातील काही जमीन रहिवासी करण्याबाबतचा विषय सभागृहात आला.त्यालाही या नगरसेवकांनी विरोध दर्शविला. हॉटेल ट्रायस्टार ते ताडोबा प्रस्तावित बायपास रोड रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर झाल्याची घोषणा महापौर अंजली घोटेकर यांनी केली. त्याला नगरसेविका सुनिता लोढिया आणि काही नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. अमृत योजनेमुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे, याकडे नगरसेवक सचिन भोयर यांनी लक्ष वेधले. या संदर्भातील बॅनर घेऊनच ते सभागृहात आले व कंत्राटदाराविरोधात घोषणाबाजी केली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका