खैरगाव येथे जिलेटिन स्फोटके जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:41 AM2021-02-26T04:41:40+5:302021-02-26T04:41:40+5:30

कोरपना : तालुक्यातील खैरगाव येथे विहिरीच्या कामात विनापरवानगी जिलेटिन स्फोटके वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी स्फोटके जप्त ...

Gelatin explosives seized at Khairgaon | खैरगाव येथे जिलेटिन स्फोटके जप्त

खैरगाव येथे जिलेटिन स्फोटके जप्त

googlenewsNext

कोरपना : तालुक्यातील खैरगाव येथे विहिरीच्या कामात विनापरवानगी जिलेटिन स्फोटके वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी स्फोटके जप्त केली. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी ५ वाजता

करण्यात आली.

मौजा खैरगाव येथे जलस्वराज योजनेअंतर्गत विहिरीचे काम सुरू आहे. या कामाच्या ब्लास्टिंगसाठी जिलेटिन स्फोटके कुठलीही परवानगी नसताना वापरण्यात येत होते. नियमानुसार स्फोटक पदार्थ नियम २००८ यातील तरतुदीनुसार विस्फोटक नियंत्रक कार्यालय वर्धा व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची परवानगी अनिवार्य आहे. मात्र त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी १८ नग जिलेटिनसह ट्रॅक्टर, बॅटरी, इलेक्ट्रिक वायर असा एकूण सात लाख पाच हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सत्यनारायण रतनलाल दरोगा, कालूराम नानुराम पांढरी यांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी राजू नेहरू चौधरी रा. जाम हा फरार आहे. त्याचा शोध कोरपना पोलीस घेत आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपनाचे पोलीस निरीक्षक अरुण गुरनुले व कोरपना पोलिसांनी केली.

Web Title: Gelatin explosives seized at Khairgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.