शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षानंतर पूर्ण होणार गोवरीचा बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:43 IST

१३ वर्षांपूर्वी निधीअभावी रखडलेला गोवरी येथील बंधारा आता पूर्णत्वास येणार असून या बंधाऱ्याच्या बांधकामाला खनिज विकास निधीतून ६६.४३ लाखांची मंजुरी मिळाली आहे. कामाची निविदासुद्धा लवकरच निघणार आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वी पाहिलेले शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न हा बंधारा बांधकामानंतर पूर्णत्वास येणार आहे.

ठळक मुद्देहरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण : खनिज विकास निधीतून ६६ लाखांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : १३ वर्षांपूर्वी निधीअभावी रखडलेला गोवरी येथील बंधारा आता पूर्णत्वास येणार असून या बंधाऱ्याच्या बांधकामाला खनिज विकास निधीतून ६६.४३ लाखांची मंजुरी मिळाली आहे. कामाची निविदासुद्धा लवकरच निघणार आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वी पाहिलेले शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न हा बंधारा बांधकामानंतर पूर्णत्वास येणार आहे.राजुरा तालुकचयातील गोवरी गावालगतच्या नाल्यावर शासनाने २००६ बंधाऱ्याच्या बांधकामाला सुरुवता केली. मात्र संबंधित कंत्राटदाराने बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास नेले नाही. त्यावेळी बंधारा नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने बंधारा बांधकामाचा आर्थिक बजेट वाढत गेला. त्यानंतर बंधारा पूर्णत्वास नेण्यााठी बंधारा समितीचे अध्यक्ष नागोबा पाटील लांडे यांनी व नागरिकांनी आमदार, खासदार व संबंधित विभागाकडे अनेकदा चकरा मारल्या. मात्र नियोजित वेळेत बंधाऱ्याचे बांधकाम न झाल्याने बंधाऱ्याचा आर्थिक बजेट वाढला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य सुनील उरकुटे यांनी बंधारा पूर्णत्वास नेण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यानंतर गोवरी येथील प्रकाश काळे यांनी या अर्धवट बंधाऱ्याची तक्रार पालकमंत्री तक्रार निवारण कक्षाकडे हॅलो चांदा अंतर्गत केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात आली. लोकमतनेही हा अर्धवट बंधारा पूर्णत्वास यावा, यासाठी वृत्तपत्रातून शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे जिल्हा खनिज निधी अंतर्गत गोवरी येथील अर्धवट बंधाऱ्याच्या बांधकामासाठी ६६ लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून या कामाची निविदा लवकरच निघणार आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वी हरितक्रांतीचे स्वप्न पाहिलेल्या शेतकऱ्यांचे स्वप्न आता पूर्णत्वास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शेकडो हेक्टर शेती येणार सिंचनाखालीबल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोवरी गावाच्या सभोवताल वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणी आहे. या कोळसा खाणींमुळे या परिसरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे हा बंधारा पूर्ण झाल्यास गोवरी येथील नागरिकांना व परिसरातील शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा मोठा लाभ होणार आहे. सिंचनासाठी शेतकऱ्यांना हा बंधारा वरदान ठरणारा असून या बंधाऱ्यामुळे शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने गोवरीवासीयांसाठी हा बंधारा अधिक लाभदायक ठरणारा आहे.

टॅग्स :Waterपाणी