शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गॅस एजन्सीने ग्राहकांना सुविधा पुरवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:28 IST

देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हे या दिशेने उचललेले पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबीयांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले. ग्रामीण महिलांना धुरमुक्त करून त्यांचे जीवन आरोग्यदायी ठेवण्याचे कार्य जोमाने सुरू आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : मुधोली येथे उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलिंडर वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हे या दिशेने उचललेले पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबीयांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले. ग्रामीण महिलांना धुरमुक्त करून त्यांचे जीवन आरोग्यदायी ठेवण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. त्यामुळे नवनिर्मित गॅस एजन्सीने ग्राहकांच्या आकांक्षांचे प्रतीक व्हावे. त्यांची अडवणूक करू नये, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. शनिवारी भद्रावती तालुक्यातील मुधोली येथील कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी मंत्री संजय देवतळे, जि.प. सभापती अर्चना जिवतोडे, भाजपा तालुका अध्यक्ष तुळशिराम श्रीरामे, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, जि.प. सदस्य प्रवीण सुर, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, नरेंद्र जिवतोडे, रवींद्र गुरूनुले, लोचन वानखेडे, यादव लेनगुरे, माणिकराव लेनगुरे, सरपंच गायत्री बागेसर, बेबी चावरे, मंजु लेनगुरे, दत्ता लेनगुरे आदी उपस्थित होते. मुधोली, चंदनखेडा व अन्य गावांतील महिलांना मान्यवरांच्या हस्ते गॅस कनेक्शन वितरण करण्यात आले.ना. अहीर म्हणाले, गॅस एजन्सीने ग्राहकाभिमुखतेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. सिलिंडरधारकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा. विनापरवाना पाच सिलेंडर गावात राखीव ठेवण्याची एचपी कंपनीची परवानगी घ्यावी. गरजु नागरिकांन वेळेवर अडचण निर्माण होणार नाही. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे जंगल तोडीच्या प्रकारावर अंकुश बसला. महिलांची विवंचना दूर झाली, असेहीे त्यांनी सांगितले. ५५ गावांना किमान १५ लाखांचा विकास निधी देण्याचे प्रस्तावित असून प्रकल्पबाधीत गावांमध्ये आरो वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली. यावेळी परिसरातील सरपंच उपस्थित होते.