शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गणेश रहिकवारची चित्रपट क्षेत्रात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:14 IST

विविध विषयांवर एकामागून एक लघु कथाचित्रपट तयार करून त्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे बल्लारपूर येथील गणेश रहिकवार यांची बल्लारपूरचे सुभाष घई अशी ओळख आहे. त्याला अर्थही तसाच आहे. गणेश रहिकवार यांची अंगकाठी, चेहरा मोहरा सुभाष घई यांच्या प्रमाणेच असून चित्रपटाबाबत त्यांची तन्मयता ही त्यांचे सारखीच आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । पंधरा लघुचित्रपट, अनेक पुरस्कार, लेखन-दिग्दर्शनात रुची

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : विविध विषयांवर एकामागून एक लघु कथाचित्रपट तयार करून त्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे बल्लारपूर येथील गणेश रहिकवार यांची बल्लारपूरचे सुभाष घई अशी ओळख आहे. त्याला अर्थही तसाच आहे. गणेश रहिकवार यांची अंगकाठी, चेहरा मोहरा सुभाष घई यांच्या प्रमाणेच असून चित्रपटाबाबत त्यांची तन्मयता ही त्यांचे सारखीच आहे. बॉलिवूडच्या डुप्लीकेट कलाकारांना देऊन बनविलेल्या आमीर सलमान शाहरूख या चित्रपटात रहिकवार यांनी सुभाष घई यांची भूमिका साकारली आहे.विशेष म्हणजे, गणेशचा लहान भाऊ दुर्गा हा अभिनेता शाहरूख खानसारखा दिसतो. तो मुंबईतील आॅर्केस्ट्रामध्ये तसेच चित्रपट व स्टेज कार्यक्रमात ज्युनि. शाहरूख खान म्हणून वावर आहेत. तर गणेश लघुचित्रपट क्षेत्रात गाजत आहे.अभिनय, लेखन आणि चित्रपटकलेविषयी आवड गणेश यांना शालेय जीवनापासूनच होती. व्यावसायिक कॅमेरा हातात आल्यानंतर संकलनाची कलाही त्यांनी अवगत केली. लघुचित्रपट कसे बनवायचे याचे ज्ञान त्यांनी घेतले. पहिला लघुपट मित्र हा केवळ पाच मिनिटांचा बनविला. फेसबुक, व्हाट्सअ‍ॅपवर तो टाकला. लोकांना तो आवडला. त्यानंतर दोन माहितीपट बनविले. प्रतिसाद मिळत गेल्याने हुरूप वाढला आणि एकामागून एक विविध विषयांवर १० ते ७५ मिनीटपर्यंत चालणारे लांबीचे लघुचित्रपट काढले. हादसा, तुझा संसार आई, काश, जाल, नान्या, दफन, अवनी, ताई की पालकी, ए लव स्टोरी, कोई है?, बहुरूपीया इत्यादी १५ लघुचित्रपट त्यांनी आजवर बनविले आहेत.यातील अवनी हा चिपत्रट बेटी बचाओ या विषयावर ७५ मिनिटांचा चित्रपट आहे. या लघु चित्रपटाला राष्टÑीय पुरस्कारही मिळाले आहेत. इतर ही अनेक पुरस्कार त्याने मिळविले आहेत. संकलनाची उत्तम जाण त्यांना आहे. सोबतच छायांकनाची, त्यामुळे त्यांची चित्रपट तंत्रशुद्ध आणि देखणी असतात. त्यांच्यातील हे गुण बघूनच नांदेड येथील एका निर्मात्याने ‘स्मशान’ तसेच ‘दानत’ या दोन चित्रपटांची जबाबदारी सोपविली. ती त्यांनी नुकतीच पूर्ण केली आहे. ‘पश्चाताप’ आणि ‘एक कदम स्वच्छता की ओर’ या दोन लघुचित्रपटांवर सध्या त्यांचे काम सुरू आहे. त्यानंतर अडीच तासाच्या पिक्चर फिल्मकडे ते वळणार आहेत. त्यांचीही नावे ठरली आहेत.गणेशच्या कलेपासून इतरांना प्रेरणागणेश यांनी या क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले आहे. आपल्या चित्रपटात ते बल्लारपूर, चंद्रपूर तसेच नजिकच्या गावातील कलावंताना वाव देत आहेत. त्यांची झेप मोठी आहेच, सोबतच या भाागातील अभिनय प्रतिभा अधिक समृद्ध व्हावी, याकरिता ते प्रयत्नशील आहेत. बल्लारपूरसारख्या लहान शहरातील गणेश रहिकवार यांची लेखन, दिग्दर्शन, संकलन व छायांकन याबाबतची झेप कौतुकास्पद आहे. एक कलावंत म्हणून त्यांनी केलेले कार्य जिल्ह्यातील इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

टॅग्स :cinemaसिनेमा