शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:03 IST

आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी गणेशभक्तांनी जवळजवळ पूर्ण केली आहे.

ठळक मुद्देलगबग वाढली : गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी गणेशभक्तांनी जवळजवळ पूर्ण केली आहे. बाप्पा आपल्या घरी राहायला येणार, म्हणून नागरिक उत्साहित झाले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनीही मंडप उभारणी, डेकोरेशन, विद्युत पुरवठा याची तयारी पूर्ण केली आहे. शुक्रवारी मोठ्या उत्साहात श्रींचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.गणेशोत्सव दिवाळीनंतरचा वर्षभरातील मोठा उत्सव समजला जातो. या उत्सवामुळे दहा दिवस शहरात, गावागावात भक्तीचे वातावरण राहते. यंदा हा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हाभरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. मूर्तीकार महिनाभरापासूनच मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. तेदेखील आता मूर्तीवर शेवटचा हात फेरताना दिसून येत आहे. शुक्रवारी बाजारपेठेत गर्दी उसळत असल्याने अनेकजण दोन दिवसांपूर्वीच गणेशमूर्ती घेऊन ठेवतात. त्यामुळे शहरातील हिंदी सीटी शाळेजवळ आणि छोटा बाजार चौकात गणेशमूर्र्तींची दुकाने लागली आहे. हिंदी सिटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यानच्या मार्गावर महानगरपालिकेकडून गणेशमूर्र्तींच्या दुकानांसाठी मंडप उभारून दिले जाते.हे कामदेखील आज बुधवारी अंतिम टप्प्यात आलेले दिसले. काही सार्वजनिक गणेश मंडळे आजच आपल्या गणेशमूर्ती मंडपात नेऊन ठेवताना दिसून आले.दरम्यान, रामाळा तलाव आणि दाताळा मार्गावरील इरई नदीपात्रात नागरिकांकडून गणेशाचे विसर्जन केले जाते. अनेकजण एक दिवसानंतर गणेश विसर्जन करतात. त्यामुळे हे विसर्जनस्थळही प्रशासनाने स्वच्छ केले आहे. मनपाकडून निर्माल्यकुंडाची व्यवस्था आहे.वर्गणीतून दहा टक्के रक्कम अनाथाश्रमाला देण्याचे आदेशसावंजनिक गणेश मंडळांनी नागरिकांकडून गोळा केलेल्या वर्गणीची उधळपट्टी होऊ नये म्हणून या वर्गणीच्या रकमेवर धर्मादाय आयुक्तांची नजर असणार आहे. विशेष म्हणजे, गणेश मंडळांनी गोळा केलेल्या वर्गणीच्या रकमेतील १० टक्के रक्कम अनाथाश्रमाला द्यावी, असे आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त एस.जी. डिगे यांनी दिले आहे. तशी नोटीस सार्वजनिक गणेश मंडळांना जारी करण्यात आली असून या संबंधीचा अहवाल स्थानिक धर्मदाय आयुक्त कार्यालयात देण्याच्या सूचनाही गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सवासाठी येथील सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करून नोंदणी करणे बंधनकारक आहे. मंडळांनी सर्व अटींची पूर्तता केल्यानंतरच धर्मदाय आयुक्तांकडून गणेशोत्सवासाठी परवानगी दिली जाते. सार्वजनिक गणेशोत्सवाकडे सामाजिक उपक्रम म्हणून बघितले जाते. समाजात एकोपा वाढवा, हा सार्वजनिक गणेशोत्सवामागील मूळ उद्देश आहे. या धार्मिक कार्यातून सार्वजनिक गणेश मंडळांकडून सामाजिक कार्यही व्हावे या उदात्त हेतूने धर्मदाय आयुक्तांनी यावर्षीपासून हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. यात सार्वजनिक गणेश मंडळांनी गोळा केलेल्या वर्गणीच्या रकमेतील दहा टक्के रक्कम अनाथाश्रमाला द्यायची आहे. ही रक्कम दिल्यानंतर त्याचा अहवाल धर्मदाय आयुक्त कार्यालयात देणे बंधनकारक आहे. या संबंधीच्या नोटीस धर्मदाय आयुक्तांकडून गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाला गणेश मंडळांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.