शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूर नगरपरिषदेच्या कचरा डेपोमुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:35 IST

कोरपना तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गडचांदूर शहरातून जमा केलेला घनकचरा काही वर्षांपासून गडचांदूर-भोयगाव रस्त्यालगत रेल्वे फाटकाजवळ टाकण्यात येत आहे

ठळक मुद्देघाणीचे साम्राज्य : वाहन चालकांचा नाक-तोंड दाबून प्रवास

आॅनलाईन लोकमतगडचांदूर : कोरपना तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गडचांदूर शहरातून जमा केलेला घनकचरा काही वर्षांपासून गडचांदूर-भोयगाव रस्त्यालगत रेल्वे फाटकाजवळ टाकण्यात येत आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा कचरा डेपो बंद करावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे कोरपना तालुका उपाध्यक्ष मुन्ना मासीरकर यांनी केली आहे. मार्च अखेरपर्यंत कचरा डेपो न हलविल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.गडचांदूर शहरातून संकलित करण्यात आलेला घनकचरा काही वर्षांपासून घंटागाड्याच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला टाकला जात आहे. कचºयाचे वर्गीकरण करण्यात न आल्याने ओला कचरा सडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. तोच कचरा पेटविल्यामुळे मुख्य रस्त्यावर धुराचे लोळ येतात. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाºया वाहन चालकांना नाक-तोंड दाबूनच पुढे जावे लागत आहे. त्याच वेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या ठिकाणाजवळ चारही बाजुने नागरी वस्ती वाढल्याने कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्यांनाही त्रास होत आहे. परिणामी दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचºयामुळे डासांच्या प्रादुर्भाव वाढला असून यामुळे डेंग्यू, मलेरिया स्वाईन फ्लू या सारख्या साथीच्या आजाराची भीती आहे. याच आवारात मोकाट कुत्रे, डुकरे, मोकाट जनावरे कचºयामध्ये अन्न शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याने कचरा अधिकच पसरत आहे.केंद्र आणि राज्य शासन देशभरात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवीत असताना गडचांदूर जवळील महामार्ग याला अपवाद ठरत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील कचरा डेपो योग्यस्थळी हलविण्यात यावे, घाणीचा नागरिकांना त्रास होणार नाही याची दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.काही वर्षांपासून गडचांदूर नगर परिषदेने गडचांदूर-भोयगाव रस्त्यालगत रेल्वे फाटकाजवळ कचरा डेपो बनविला आहे. या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना ओल्या कचऱ्यांने व धुळाच्या लोळाने आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषेदेने रस्त्यावरील कचरा डेपो तत्काळ योग्यस्थळी हलवावे अन्यथा आंदोलन करावे लागेल.- मुन्ना मासीरकर,उपाध्यक्ष,कोरपना तालुका युवक काँग्रेस.