लोकमत संस्काराचे मोती : आठव्या वर्गातील श्रृती येवले विजेतीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आठव्या वर्गात शिकणारी श्रृती केशवराव येवले ही विद्यार्थिनी ‘लोकमत संस्काराचे मोती’ या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे तिला हवाई सफरच्या माध्यमातून दिल्ली दर्शन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यासाठी श्रृती बुधवारी पहिल्यांदाच विमानात बसून हवाई सफर करणार आहे.‘लोकमत’च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्काराचे मोती हे सदर गेल्या अनेक वर्षापासून सुरू करण्यात आले आहे. या सदरात विद्यार्थ्यांना परिपाठ, थोरांची ओळख, ज्ञानविज्ञान, इतिहास, संशोधन, साहित्य, कला, क्रीडा या विविध क्षेत्रातील वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थी वाचक स्पर्धा घेतल्या जातात. गडचांदूर येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आठवी शिकत असलेली श्रृती केशवराव येवले ही संस्काराचे मोती या उपक्रमाची नियमित वाचक आहे. नुकत्याच झालेल्या हवाई सफरसाठी ‘लोकमत’च्या वतीने जिल्ह्यातून श्रृतीला संधी मिळाली आहे.श्रृतीच्या घरात आतापर्यत हवाई सफर म्हणजे दिवास्वप्न वाटायचे. आपल्या घरातील कुणाला ही संधी मिळेल, असा विचारही कुणाही केला नसताना घरातील लाडकी मुलगी श्रृती हिला लोकमत संस्काराचे मोती स्पर्धेमुळे ही संधी चालून आल्याने घरातील मंडळींचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. शिक्षकांचे मोठे सहकार्य लाभल्याचे ती म्हणते.‘लोकमत’मुळे आनंद द्विगुणितलहानपणापासून आकाशात उंचावरुन उडणारे विमान पाहायचो. त्यातच मोठा आनंद व्हायचा. कधी स्वप्नातही इतक्या लवकर विमानातून हवाई सफर करू असे वाटले नव्हते. ‘लोकमत’ने संस्काराचे मोती या स्पर्धेद्वारे माझ्या ज्ञानवृद्धीचा यज्ञ सुरू ठेवतानाच हवाई सफरीची संधी देऊन आनंद द्विगुणित केल्याची भावना श्रृती केशवराव येवले हिने व्यक्त केली.
गडचांदूरची श्रृती हवाई सफरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2017 00:44 IST