शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

घोडाझरीत तेंदूपत्ता संकलनावर गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 21:40 IST

फाटक्या संसाराची विस्कटलेली आर्थिक घडी सुधारणारा तेंदूपत्ता हंगाम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, घोडाझरी अभयारण्याच्या प्रभावक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनाला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना यावर्षी रोजगारापासून वंचित राहावे लागणार आहे.

ठळक मुद्देपरवानगी नाकारली : नागरिक रोजगारापासून वंचित राहणार

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : फाटक्या संसाराची विस्कटलेली आर्थिक घडी सुधारणारा तेंदूपत्ता हंगाम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, घोडाझरी अभयारण्याच्या प्रभावक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनाला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना यावर्षी रोजगारापासून वंचित राहावे लागणार आहे.नागभीड तालुका जंगल व्याप्त आहे. तालुक्यातील शेकडो गावे जंगलावर अवलंबून आहेत. शेतीसोबतच या परिसरातील नागरिक मोहफुले वेचणे, मध, डिंक व रानमेवा गोळा करतात. यातील तेंदूपत्ता संकलनाचे काम सर्वाधिक लाभकारक आहे. नागभीड वनपरिक्षेत्रातील नवखळा, कुनघाडा चक, कोरंबी, पेंढरी, चिचोली, कसर्ला, डोंगरगाव, चिंधी चक, किटाळी बोरमाळा, हुमा, घोडाझरी व चिंधी माल आदी गावे अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रातील येतात.मागील वर्षी जानेवारी महिन्यात तालुक्यातील घोडाझरी पर्यटन स्थळाला अभयारण्य म्हणून शासनाने परवानगी दिली. परिणामी ही गावे घोडाझरी अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. या गावातील नागरिक शेतीसोबतच तेंदूपत्ता संकलन करण्याकडे ‘जोड व्यवसाय' म्हणून पाहतात.या काळात भात शेतीची कोणतीही कामे शिल्लक राहत नाही. साधारणत; एक महिना तेंदूपत्त्याचा हा हंगाम सुरू राहतो. या हंगामात घरातील सर्वच सदस्य तेंदूपत्ता संकलनात भाग घेतात. कुटुंबाची आर्थिक स्थिती रूळावर आणण्यासाठी तेेंदुपत्ता हंगाम मोठा आधार वाटतो. मात्र, घोडाझरी अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रातील अनेक गावांमध्ये तेंदुपत्ता संकलनाला मनाई करण्यात आली. त्यामुळे रोजगारासाठी कुठे जावे, हा फार मोठा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रात घोडाझरी अभयारण्य प्रभावित गावे आहेत. ती गावे नेमकी किती आहेत, याची माहिती मिळाली नाही. ही गावे पुन्हा वाढू शकतात, असेही ग्रामस्थांनी सांगितले.केवळ १९ पानफळ्या राहणार सुरूवनपरिक्षेत्रात केवळ तेंदूपत्ता संकलनाच्या १९ पानफळ्या सुरू राहणार आहेत. याअगोदर ४३ पानफळ्या सुरू होत्या. पण, यातील ११ फळ्या नाममात्र असल्याची माहिती पुढे आली. प्रत्यक्षात ३२ फळ्यांवरच तेंदूपत्ता संकलन केल्या जात होते. यातील १३ फळ्यांवर गदा आली. यावर्षी २२ एप्रिलपासून तेंदूपत्ता सुरू होण्याची शक्यता आहे. हा हंगाम सुमारे एक महिना चालतो.