शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांचे भवितव्य अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:58 IST

जि. प. शाळांतील १० पेक्षा कमी पटसंख्येविषयी सकारात्मक तोडगा काढण्याऐवजी शाळा समित्यांकडून ठराव मागवून केवळ वेळ मारून नेण्याचा निर्णय सरकारने घेतला.

ठळक मुद्देपालकांमध्ये नाराजी : शाळा बंदचा निर्णय अन्यायकारक

ऑनलाईन लोकमतचिखलपरसोडी: जि. प. शाळांतील १० पेक्षा कमी पटसंख्येविषयी सकारात्मक तोडगा काढण्याऐवजी शाळा समित्यांकडून ठराव मागवून केवळ वेळ मारून नेण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे संविधानातील मूलभूत हक्कांवर गदा आली आहे असून नागभीड तालुक्यातील सुमारे ३० शाळांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार असून यापासून कुणीही वंचित राहु नये, यासाठी सर्व शिक्षण अभियान अंतर्गत विविध योजना सुरू केल्या. दरम्यान, ज्या जि.प. शाळेची १० टक्क्यापेक्षा कमी आहे. अशा सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत सामावून घेण्याचे धोरण जाहीर केले. परंतु, त्यामध्ये अनेक विसंगती आहेत. तालुक्यातील ३३ जि.प. शाळांचे नाव संभाव्य बंदच्या यादीमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे.२०१४ ते २०१८ सत्रादरम्यान ज्या शाळेची पटसंख्या १० टक्के पेक्षा कमी झाली आहे. अशा शाळा बंद होणार असून त्यासाठी शासनाने शाळा व्यवस्थापन कमिटीकडून ठराव मागविला आहे. त्यामध्ये सारंगड, जीवनापूर (ढोला) रानपरसोडी, खडकी, कोदेपार, कोटगाव, उर्द शाळा नागभीड, बाळापूर खुर्द, चारगाव माना नवा नगर, बोथली, भिकेश्वर, उषाळमेंढा, मोहाळी (मो.) ढोरपा, सोनुली बु. तुकूम (ती), कसर्ला, आलेवाही, चारगाव चक, कोसंबी, धामणगाव चक, बाम्हणी, कच्चेपार, तेलीमेंढा, वासाळामेंढा, चिखलगाव, म्हसली गंगासागर हेटी आदी शाळांचा समावेश आहे. या शाळेत पटसंख्या १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. गोंविदपूर-मांगरुड, डोंगरगाव व पळसगाव या शाळेची पटसंख्या १०० पेक्षा अधिक असतानाही चुकीचे निकष लावण्याले, असा आरोप जागरूक पालक करीत आहेत. या शाळा दुसºया गावातील शाळांना जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, २ ते ४ पेक्षा अधिक किमी वरच्या गावातील शाळेत पाल्यांना पाठविण्यास पालकांचा प्रचंड विरोध आहे. गावखेड्यातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेताना असंख्य संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर पर्याय न काढता चुकीचे निकष लावण्यात आले.