शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्रातील कृषी पंपांना यापुढे 12 तास अखंडित वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 22:37 IST

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंत्री मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या संबंधात तत्काळ सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया  जिल्ह्यांत दुपारच्या वेळी कृषी पंपांसाठी वीज भारनियमन होत असल्याने शेतकरी  रात्री कामांसाठी शेतात जातात. अशावेळी वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष व वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत नागरिकांचे बळी जात असल्याने शेतकरी रात्री  शेतात जाण्यास धास्तावला. ही समस्या लक्षात घेऊन जिल्ह्यात दिवसा होणारे कृषी पंपांचे वीज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते सायंकाळी  ६ वाजेपर्यंत कृषी पंपांना सलग वीजपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंत्री मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या संबंधात तत्काळ सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया  जिल्ह्यांत दुपारच्या वेळी कृषी पंपांसाठी वीज भारनियमन होत असल्याने शेतकरी  रात्री कामांसाठी शेतात जातात. अशावेळी वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सध्या रात्रीच्या वेळी शेतीची कामे करण्यास शेतकरी वर्ग धास्तावला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मंत्री मुनगंटीवार यांना भेटून विनंती केली होती. विषयाचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर  व गोंदिया जिल्ह्यांचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना दिवसा कृषी पंपांना वीजपुरवठा करण्याची विनंती केली. त्यांनी तत्काळ मान्यही केली. याबाबतचे आदेश लवकरच निर्गमित होणार असून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उत्पादनाचे नुकसान टळणारकृषिपंपांना वीजपुरवठा मुबलक नसल्याने विहिरीतील पाणी शेतीला देता येत नाही. या समस्येने शेतकरी हैराण झाले आहेत, पण त्यावर उपाययोजना झाली नव्हती. जिल्ह्यातील शेतीला ऊर्जास्रोत कमी पडत आहे. ऊर्जेअभावी शेतीस पाणी न मिळाल्याने पिकांना पाण्याचा ताण बसतो आणि त्याचा फटका उत्पादनाला बसतो. अशा एक ना अनेक समस्यांनी शेती ग्रासली आहे.

 वनक्षेत्रात सर्वाधिक अडचणीवनक्षेत्रातील शेतकरी आता पारंपरिक भातशेतीसोबत विविध प्रकारची नगदी पिके घेण्यास उत्सुक झाले; परंतु कृषिपंप असूनही विजेअभावी त्यांचा निरुपयोग झाला. नगदी पिकांचा अभाव आणि पारंपरिक शेतीमुळे अल्प उत्पादन या दुष्टचक्रात जिल्ह्यातील शेती अडकली आहे. विजेच्या सतत टंचाईने शेतीची कामे अर्धवट ठेवावी लागतात.

 

टॅग्स :electricityवीजagricultureशेती