शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

निधी मिळाला, मात्र विद्यार्थ्यांना गणवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

शाळांतील समग्र शिक्षा अभियानाचे बँक खाते यापूर्वी विविध राष्ट्रीयकृत बँकेत होते. यातून सर्व व्यवहार केले जात होते. या खात्यातील सर्व निधी जिल्हा परिषदेने परत घेऊन महाराष्ट्र बँकेत नवीन खाते काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शिक्षकांनी धावपळ करीत महाराष्ट्र बँकेत खाते काढले. मात्र, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाचा निधी पुन्हा जुन्याच खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. त्यामुळे सध्या शिक्षक संभ्रमात पडले आहेत. 

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आठव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत गणवेश दिला जातो. कोरोना संकटातही राज्य शासनाने जिल्ह्यासाठी २ कोटी ५४ लाख ६८ हजार रुपयांचा निधी शिक्षण विभागाकडे पाठविला. मात्र, शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार मुख्याध्यापकांनी शाळांचे जुने बँक खाते यापूर्वीच बंद केले आहे. नवीन बँक खात्यात निधी जमा करण्यास शिक्षण विभाग नकार देत असल्याने निधी असतानाही शिक्षण विभागाचे नियोजन नसल्याने विद्यार्थ्यांना गणवेशाविना राहण्याची वेळ आली आहे. त्यातच गणराज्य दिनही गणवेशाविनाच जाणार की, काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शाळांतील समग्र शिक्षा अभियानाचे बँक खाते यापूर्वी विविध राष्ट्रीयकृत बँकेत होते. यातून सर्व व्यवहार केले जात होते. या खात्यातील सर्व निधी जिल्हा परिषदेने परत घेऊन महाराष्ट्र बँकेत नवीन खाते काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शिक्षकांनी धावपळ करीत महाराष्ट्र बँकेत खाते काढले. मात्र, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाचा निधी पुन्हा जुन्याच खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. त्यामुळे सध्या शिक्षक संभ्रमात पडले आहेत. शाळांचे खाते बंद झाले असतानाही पुन्हा सुरू कसे होणार हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. दरम्यान, बँकांना विनंती करून जुनेच खाते सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने शाळांना कळविले आहे. मात्र एकदा बंद झालेले बँक खाते पुन्हा कसे सुरु होणार, हा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. यामध्ये मात्र विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत जात आहेत.

या विद्यार्थ्यांना मिळतो गणवेश- १ ते ८ वर्गातील सर्व मुलींना तसेच अनुसूचित जाती जमातीतील मुले, दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना दरवषी शासनाकडून दोन गणवेश मोफत दिले जाते. कोरोना संकटामुळे मागील वर्षी एक तसेच यावर्षीही एकाच गणवेशाचा निधी  पंचायत समितीपर्यंत पाेहचला आहे.

२ कोटी ५४ लाख मिळाला निधी

- विद्यार्थ्यांना गणवेशासाठी राज्य शासनाने २ कोटी ५४ लाख ६८ हजार रुपयांची निधी पाठविला आहे. यातून प्रत्येक विद्यार्थ्यांना ३०० रुपयांचा गणवेश मिळणार आहे. 

शाळांचे विविध बँकेत असलेले सर्व शिक्षा अभियानांतर्गत खाते शून्य शिल्लक करून नवीन समग्र शिक्षा खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काढण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. समग्र शिक्षा नवीन खाते काढल्याने शून्य शिल्लक खाते शाळांनी बंद केले. आता परत जुने खाते सुरू करायचे असेल तर प्रशासनाने बँकेशी थेट पत्रव्यवहार करावा. जुने बँक खाते पुन्हा सुरू करण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे.-प्रकाश चुनारकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक)

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा