शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णाच्या राजराजेश्वर देवस्थान विकासासाठी निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:32 IST

अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पोंभुर्णा येथील श्री राजराजेश्वर देवस्थान येथील दोन कोटी २२ लाख २४ हजार रू. किमतीच्या पर्यटन विषयक विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २४ जानेवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची माहिती : सव्वा दोन कोटीतून पर्यटन विकास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पोंभुर्णा येथील श्री राजराजेश्वर देवस्थान येथील दोन कोटी २२ लाख २४ हजार रू. किमतीच्या पर्यटन विषयक विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २४ जानेवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.पोंभुर्णा येथील श्री राजराजेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान असून या ठिकाणी सभागृहाचे बांधकाम व मंदीर परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी होती. या मागणीच्या पूर्ततेसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने दोन कोटी २२ लाख २४ हजार रू. निधी मंजूर केला आहे. मंदीर परिसराचे सौंदर्यीकरण, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण यासह एका सभागृहाचे बांधकाम, असे या एकूण विकासकामांचे स्वरूप आहे. सन २०१८-१९ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सदर विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, पंचायत समिती व तहसिल कार्यालयाची नुतन इमारत, बांबु हॅन्डीक्रॉफ्ट अ‍ॅन्ड आर्ट युनिट, टूथपिक उत्पादन केंद्र, ग्रामीण रूग्णालय, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क आदी विकासकामांसह मधुमक्षिका पालनाशी संबंधित कृषी उद्योग, अगरबत्ती उत्पादन युनिट, कुक्कुट पालन व दुग्धव्यवसाय प्रकल्प, पोंभर्णासाठी स्वतंत्र वन परिक्षेत्राची निर्मिती, एमआयडीसी असे विविध प्रकल्पसुध्दा मंजूर करण्यात आले आहे. पोंभुर्णा शहरात अत्याधुनिक बस स्थानकाचे बांधकामसुध्दा प्रगतीपथावर आहे. पोंभुर्णा येथील श्री राजराजेश्वर मंदीर परिसरात पर्यटन विषयक विकासकामांना मंजुरी मिळाल्यामुळे या शहराच्या सौंदर्यात अधिक भर घातली जाणार आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारRajrajeshwar Templeराजराजेश्र्वर मंदिर