शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीवरील धानोरा, आमडी व आर्वी-धानूर बॅरेजसाठी निधी द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 22:11 IST

जिल्ह्यातील वर्धा नदीवरील धानोरा, आमडी व आर्वी-धानुर या तीन बॅरेजच्या स्थळी ७.५० मीटरपेक्षा जास्त खोलीवर कठीण भूस्तर उपलब्ध होत असल्यामुळे सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन व सविस्तर प्रकल्प अहवाल वॉप्कोस या संस्थेकडून करून घेण्यासाठी मान्यता देण्याचा ठराव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आला आहे. सदर तिन्ही बॅरेजेसच्या कामासाठी निधी उपलब्ध करवून देण्याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील वर्धा नदीवरील धानोरा, आमडी व आर्वी-धानुर या तीन बॅरेजच्या स्थळी ७.५० मीटरपेक्षा जास्त खोलीवर कठीण भूस्तर उपलब्ध होत असल्यामुळे सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन व सविस्तर प्रकल्प अहवाल वॉप्कोस या संस्थेकडून करून घेण्यासाठी मान्यता देण्याचा ठराव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आला आहे. सदर तिन्ही बॅरेजेसच्या कामासाठी निधी उपलब्ध करवून देण्याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली व मागणीचे निवेदन सादर केले.आमडी, आर्वी धानुर, धानोरा हे तिन्ही बॅरेजेस अतिशय महत्त्वाचे बॅरेजेस आहेत. धानोरा बॅरेजमधून चंद्रपूर शहरास पिण्याकरिता २५ दलघमी, औद्योगिक क्षेत्राकरिता ४४.५६ दलघमी पाण्याचे नियोजन आहे. तसेच आमडी बॅरेजमधून बल्लारपूर, राजुरा व चंद्रपूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याकरिता ३० दलघमी, औद्योगिक क्षेत्राकरिता २४.१७ दलघमी पाण्याचे नियोजन आहे. सदर बॅरेजस करिता वनजमिनीची आवश्यकता नाही.आमडी बॅरेजचे सिंचन क्षेत्र २८९० हेक्टर, आर्वी धानुर बॅरेजची सिंचन क्षेत्र ४०२१ हेक्टर तर धानोरा बॅरेजचे सिंचन क्षेत्र ४३४१ हेक्टर इतके आहे. आमडी बॅरेजची अंदाजित किंमत २१७ कोटी, आर्वी धानुर बॅरेजची अंदाजित किंमत १६४.५० कोटी तर धानोरा बॅरेजची अंदाजित किंमत ३२८.११ कोटी इतकी आहे. सदर बॅरेजसाठी आवश्यक निधी त्वरीत उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी या चर्चेदरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. सदर मागणी तपासून याबाबत त्वरीत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले.मान्यतेसाठी नियामक मंडळाच्या बैठकीत ठराव पारितगुरुवार दि. १० जानेवारी रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व वरील विषयाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, तीन बॅरेजेसच्या कामासंदर्भात सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन व सविस्तर प्रकल्प अहवाल वॉप्कोस या संस्थेकडून करून घेण्यासाठी मान्यता मिळण्याच्या दृष्टीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरच्या नियामक मंडळाच्या ७१ व्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे.