शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

फ‌ळ विक्रेत्यांनी केले रस्त्यावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST

रस्ता दुभाजकावर टाकतात शिळे अन्न चंद्रपूर : येथील तुकूम परिसरातील धाडे हाॅस्पिटल ते क्राईस्ट हाॅस्पिटलपर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजकावर काही ...

रस्ता दुभाजकावर टाकतात शिळे अन्न

चंद्रपूर : येथील तुकूम परिसरातील धाडे हाॅस्पिटल ते क्राईस्ट हाॅस्पिटलपर्यंतच्या रस्त्यावरील दुभाजकावर काही नागरिक शिळे अन्न टाकत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

वीज खांब त्वरित बदलावे

चंद्रपूर : शहरातील काही भागातील वीज खांब वाकले आहेत. त्यामुळे या खांबांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक दिवसापासून खांब वाकलेल्या अवस्थेत आहेत.

झुडपांमुळे नालीचे अस्तीत्व धोक्यात

चंद्रपूर : येथील राधाकृष्ण टाॅकीज परिसरात असलेल्या नालीमध्ये झुडपांचे साम्राज्य पसरल्यामुळे पाणी वाहून न जाता जमा होत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना दिलासा

चंद्रपूर : इंदिरा गांधी पुतळा ते वरोरा नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

रस्त्यावरच नव्या वाहनांचे प्रर्दशन

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर मार्गावरील जनता काॅलेज चौक ते वडगाव फाट्यापर्यंत काही व्यावसायिक नव्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना विक्रीसाठी रस्त्यावर ठेवतात. त्यामुळे रस्ता मोठा असूनही अनेकवेळा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिस सामान्य नागरिकांकडून दंड वसुल करतात. मात्र या व्यावसायिकांना सुट देत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

भाजीबाजारातील वजनकाटे तपासावे

चंद्रपूर : येथील गंजवार्डामध्ये मोठा भाजीबाजार भरतो. त्यामुळे नागरिक येथे भाजी घेण्यासाठी जातात. मात्र काही व्यावसायिक वजन कमी देत असल्याची ओरड नागरिकांची आहे. त्यामुळे संबंधित विभागाने येथी व्यावसायिकांकडून वजनकाटे तपासावे, अशी मागणी केली जात आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर महामार्गावर तसेच तुकूम, पठाणपुरा परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे असतात. अनेकवेळा रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध बसातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देवून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावी, अशी मागणी केली जात आहे.

जात प्रमाणपत्र त्वरित द्यावे

चंद्रपूर : मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी जात पडताळणी कार्यालयामध्ये अर्ज सादर केले आहे. मात्र प्रकरणाचा त्वरित निपटाराच होत नसल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

प्लाॅस्टिक पिशव्यांचा पुन्हा वापर वाढला

चंद्रपूर : शहरात दिवसेंदिवस प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर वाढत आहे. मात्र महापालिका प्रशासन याकडे दर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या शेजारीच असलेल्या गोल बाजारातही मोठ्या प्रमाणात व्यावसायिक प्लाॅस्टिक पिशव्या ग्राहकांना देत आहे. त्यामुळे महापालिका प्रशानाने नव्याने पथक नेमणून यावर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

सुरक्षा रक्षकाविनाच सुरु आहे एटीएम

चंद्रपूर : शहरातील काही एटीएम केंद्रामध्ये सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळामध्ये प्रत्येक एटीएम केंद्रामध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे. मात्र शहरातील बहुतांश एटीएममध्ये ही सुविधाच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

धुळीमुळे श्वसनाचे आजार बळावले

चंद्रपूर : शहरातील काही रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच धुळ उडत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र वेळीच रस्ता दुरुस्त केला जात नसल्यामुळे समस्या अधिक गंभीर होत आहे.

बाबुपेठ परिसरात पाणीटंचाई

चंद्रपूर : शहरातील बाबूपेठ परिसरातील नागरिकांनी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नियमित नळ सोडून येथील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

अतिक्रमण हटवावे

चंद्रपूर : शहरातील गांधी चौक ते जटपुरागेटपर्यंत रस्ता रुंदीकरण केला जात आहे. मात्र अनेकांचे अतिक्रमण जैसे थे आहे. त्यामुळे याकडे संबंधित विभागाने लक्ष देवून प्रथम अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली जात आहे.