शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
3
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
4
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
5
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
6
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
7
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
8
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
9
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
10
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
11
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
12
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
13
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
14
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
15
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
16
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
17
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
18
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
19
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
20
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

आदिवासी बांधवांचा मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:24 IST

जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध प्रश्नांवर श्रमिक एल्गारच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देशेकडो नागरिकांचा सहभाग : मागण्यांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध प्रश्नांवर श्रमिक एल्गारच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.आदिवासी महिलांनी रेला नृत्य सादर करूं आझाद बगीचामधून मोर्चाची सुरूवात झाली. मोर्चात, जिवती, राजूरा, कोरपणा, चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा, सिंदेवाही, सावली, नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यातील हजारो आदिवासी सहभागी झाले होते. जिवती, राजुरा, कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोलाम, गोंड आदिवासी आहेत. त्यामुळे या आदिवासींच्या विकासासाठी जिवती येथे आदिवासी विकास विभागाचे स्वतंत्र प्रकल्प कार्यालय मंजूर करावे अशी मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली.राजुरा तालुक्यातील बेरडी गावाचे पुर्नवसन करावे, आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींकडून ताबे काढून द्यावे, डोणी गाव चंद्रपूर तालुक्यातून वगळून मूल तालुक्यात जोडावे, डोणी येथील आदिवासींना रोजगार देण्याचे दृष्टीने ताडोबा अभयारण्यांसाठी डोणी गेट सुरू करावे, आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह प्रवेश क्षमता वाढवावी, मूल येथील कोरकूंना घरे द्यावी, कॉम्पा, सोनझरी येथील आदिवासींना जातीचे दाखले द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.मोर्चाचे नेतृत्व श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष विजय सिध्दावार, प्रा. जया कापसे, शामराव कोटनाके, महासचिव घनश्याम मेश्राम, छाया सिडाम, विमल कोडापे, यात्रिका कुमरे, अमरे, सपना कामडी यांनी मार्गदर्शन केले.मोर्चात सतत संघर्ष करणारे नामदेव उदे, येल्लापूर येथील संघर्ष करून आपली जमिन ताब्यात ठेवणारी भीमबाई सिडाम, सावली तालुक्यातील आदिवासी महिला कार्यकर्त्या यात्रिका कुमरे, श्रमिक एल्गारचे महासचिव घनश्याम मेश्राम, छाया सिडाम यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत प्रत्येक विभागातील प्रशासकीय अधिकाºयांना याबाबत पत्र देणार असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी श्रमिक एल्गारचे संघटन सचिव डॉ. कल्याणकुमार, अनिल मडावी, रवी नैताम, सपना कामडी, दिनेश घाटे, शहनाज बेग, फरजाना शेख, किरण बावणे, संगीता गेडाम, बिंदू गडलींग, शालू धुर्वे बाळू मडावी, अमर कडयाम, मोनी कुळमेथे, राणी भोयर यांनी परिश्रम घेतले. या मोर्चामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.