शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:13 IST

रानटी डुकरांचा बंदोबस्त करा. नाहीतर शेतकºयांना रानडुक्कर मारण्याची परवानगी द्या, यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात ...

ठळक मुद्देश्रमिक एल्गारचे नेतृत्व : रानडुक्कर मारण्याची परवानगी द्या

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : रानटी डुकरांचा बंदोबस्त करा. नाहीतर शेतकºयांना रानडुक्कर मारण्याची परवानगी द्या, यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर शेतकºयांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा गुरुवारी दुपारी काढण्यात आला. रानटी डुकरापासून होणाºया नुकसानीची भरपाई द्यावी, सरपणासाठी लाकूड उपलब्ध करुन द्यावे, रानटी डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा, बांबू कारागिरांना हिरवा बांबू उपलब्ध करून देण्यात यावा, शेतकºयांना विनामुल्य सौरकुंपन देण्यात यावे, आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आला. सावली तालुक्यातील जंगलालगतचे शेकडोच्या संखेने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा महात्मा जोतिबा फुले चौक ते वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयापर्यंत निघाले. विजय सिध्दावार यांनी शेतकºयांची परिस्थिती अधीकाºयांपूढे मांडली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी जी. व्ही. धाडे यांना निवेदन देण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी यावेळी मागण्यांवर सखोल चर्चा करीत याबाबत वरिष्ठांना कळविणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष रामचंद्र हुलके, माजी महासचिव व केंद्रीय कमिटी सदस्य विजय कोरेवार, महासचिव घनश्याम मेश्राम, यात्रिका कुमरे यांचे भाषण झाले. यावेळी तालुका सचिव अनिल मडावी, महासचिव छाया सिडाम, अमर कड्याम, फरजाना शेख, विशाल नर्मलवार, रेषमा गेडाम व तालुक्यातील कार्यकर्ते व शेकडो शेतकरी उपस्थित होते.