लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकºयांना वन हक्क मिळावे, या मागणीसाठी वनहक्क शेतकरी अभियानच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.वनहक्क कायद्यातील तीन पिढ्यांची अट रद्द करावी, पट्टेधारक शेतकºयांना स्वतंत्र सातबारा द्यावा, वन्यप्राण्यांमुळे नुकसान होणाºया शेतकºयांना दुप्पट भरपाई द्यावी, वनहक्क दावे दाखल करण्यासाठी ५० टक्के ग्रामसभेची उपस्थिती रद्द करावी, ब्रह्मपुरी तालुक्यातील युग मेश्राम या बालकाच्या कुटुंबाला दहा लाख रूपये द्यावी, अशी मागणी मोर्चेकºयांनी केली. आझाद बगिचापासून मोर्चाची सुरूवात झाली. यावेळी श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या, सरकारने वनहक्क कायदा तयार केला. पण अन्याय सुरूच आहे. सप्टेंबरपर्यंत वनहक्काचे पट्टे दिले नाहीत तर आॅक्टोबर महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील निवासस्थाला घेराव टाकू, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी विजय सिद्धावार, झारा चांदेकर,गाईन, विजय कोरेवार, अनिल मडावी, घनश्याम मेश्राम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:58 IST
जिल्ह्यातील शेतकºयांना वन हक्क मिळावे, या मागणीसाठी वनहक्क शेतकरी अभियानच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
ठळक मुद्देशेतकरी अभियानचे नेतृत्व : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन