शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जवखेडे हत्याकांडाच्या विरोधात मोर्चा

By admin | Updated: November 11, 2014 22:38 IST

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मंगळवारी विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

चंद्रपूर : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मंगळवारी विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरूवात चंद्रपूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाली. हा मोर्चा रिपब्लिकन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. मोर्चात चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालावर पोहोचला. मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन संघर्ष समितीचे खुशाल तेलंग, प्रा.एस.टी.चिकटे, अंकूश वाघमारे, प्रविण खोब्रागडे, गोपाळराव देवगडे, अ‍ॅड.सत्यजित उराडे, सिद्धार्थ वाघमारे, शंकरराव सागोरे, रमेशचंद्र राऊत, कैविशा मेश्राम, अश्विनी खोब्रागडे, राजेश वनकर, कुशल मेश्राम, जी.के.उपरे, भारत थुलकर, सुरेश नारनवरे यांनी केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर तेथे या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणातून राज्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच कठोर शब्दात निषेध केला. जाधव कुटुंबीयांच्या मारेकऱ्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आजपर्यंतची सर्वच सरकारे दलितांवर होणारा अत्याचार रोखण्यात अपयशी ठरल्याचे सांगत वक्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. सभेनंतर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना निवेदन सादर केले. जाधव कुटुंबीयांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अहमदनगर चे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांना बडतर्फ करण्यात यावे, नगर जिल्हा दलित अत्याचार जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा, आदि मागण्या शिष्टमंडळाने निवेदनातून केल्या आहेत. (प्रतिनिधी)