शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मोफत पाठ्यपुस्तकांची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात

By admin | Updated: February 8, 2017 02:04 IST

कोणत्याही घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. शाळामधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी,

शिक्षकांची लगबग : ‘झिरो बॅलन्स’वर उघडणार विद्यार्थ्यांची बँक खाती चिमूर : कोणत्याही घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. शाळामधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी मागील काही वर्षांपासून इयत्ता पहली ते आठवीपर्यंतच्या सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यामातून मोफत पाठ्यपुस्तके दिली जात होती. परंतु यापुढे विद्यार्थ्यांना थेट पुस्तके देण्याऐवजी त्यांची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीयकृत बँकामध्ये ‘झीरो बॅलन्स’वर खाती उघडण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने १३ जानेवारीला प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. शासनाने काढलेल्या आदेशान्वये विविध कल्याणकारी योजनामध्ये वस्तू स्वरुपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तातर रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले आहे. त्या खात्याला संबंधित लाभार्थ्यांचा आधार क्रमांक जोडण्यासही सांगितले आहे. त्यानुसार कल्याणकारी योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्याचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील सगळ्याच विद्यार्थ्यांची बँकेत खाती नाहीत. शासनाच्या कोणत्याही योजनाचा लाभ त्यांना देण्यापूर्वी त्यांचे खाते बँकेमध्ये असणे आवश्यक आहे. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून यापुढे पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५ डिसेंबरच्या शासन आदेशानुसार पाठ्यपुस्तकांसाठी लागणारी रक्कम थेट संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांची खाती बँकांमध्ये असणे आवश्यक आहे. भविष्यात शासनाकडून मिळणाऱ्या पैशातून पालकांना पाल्यासाठी बाजारातून पुस्तके खरेदी करावे लागणार आहेत. वास्तविक पाहता गेल्या काही वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच पुस्तके मिळत होती. परंतु आता नव्या आदेशानुसार पालकांना ही पुस्तके खरेदी करावी लागणार आहेत. या पुस्तकांची किंमत बाजार भावाप्रमाणे राहणार आहे. पुस्तकासाठी शासन किती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)