शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोकळ्या जागा शरीर स्वास्थ्याचे केंद्र व्हाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:10 IST

प्रदूषणाच्या समस्येशी आम्ही लढत असताना शहरातील मोक्याच्या जागा अतिक्रमणाच्या घशात न जाता या ठिकाणी पर्यावरणपूरक बाबींना वाव मिळायला हवा. शहरातील मोकळ्या जागा विचारमंथन व शरीर स्वास्थ्याचे केंद्र झाल्या पाहिजे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरातील पाच मोकळ्या जागांचा होणार विकास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रदूषणाच्या समस्येशी आम्ही लढत असताना शहरातील मोक्याच्या जागा अतिक्रमणाच्या घशात न जाता या ठिकाणी पर्यावरणपूरक बाबींना वाव मिळायला हवा. शहरातील मोकळ्या जागा विचारमंथन व शरीर स्वास्थ्याचे केंद्र झाल्या पाहिजे. शरीराला व मनाला आयाम देणाºया पायाभूत सुविधा या ठिकाणी निर्माण करण्याची इच्छा होती. ती पूर्णत्वास जात असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचेपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चंद्रपूर शहरातील आनंदनगर सोसायटीमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान, भावना सोसायटीमध्ये महात्मा बसवेश्वर उद्यान, शंकरनगर सोसायटीमध्ये स्व. प्रमोद महाजन उद्यान, इंजिनिअर्स कॉलनीमध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान, लक्ष्मीनगर सोसायटीमध्ये राजमाता राणी हिराई उद्यानाचे लोकार्पण बुधवारी सायंकाळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे, सभागृह नेता वसंत देशमुख, झोन सभापती देवानंद वाढई आदी उपस्थित होते.ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, एकाच दिवशी पाच मोकळया जागेच्या ठिकाणी देखण्या उद्यानाचे लोकार्पण करताना आनंद झाल्याचे सांगितले. महानगरपालिका हद्दीमधील मोकळया जागा हे अतिक्रमणाचे केंद्र बनतात. यातून या जागा पुढे घाणीचे साम्राज्य वाढवतात. चंद्रपूर शहरात अशा पध्दतीचे मोकळया जागांना बकाल स्वरुप येऊ नये, यासाठी वैशिष्टयपूर्ण योजना निधीतून शहरातील या मोकळया जागांना महापुरुषांच्या नावाने उद्यान उभारण्याचे कार्य आपण सुरु केले असून वेगवेगळया ठिकाणी चांगल्या स्वरुपात ही उद्यानं लोकांसाठी मोकळी झाल्याचा आनंद आहे. परिसरात राहणाºया दक्ष नागरिकांनी विशेषत: जेष्ठ नागरिक संघांनी या विकसित जागेच्या संरक्षणाची जबाबदारी स्वयंप्रेरणेने घ्यावी. महानगरपालिका आपले दायित्व पूर्ण करेलच. परंतु अशा सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाची व सुरक्षेची जबाबदारी घेणाºया लोकांमध्ये वाढ झाली पाहिजे. ही सुरक्षित स्थळे विचार मंथनाची आणि शरीराला स्वस्थता देणारी केंद्र झाली पाहिजे. शहरातील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार