शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिसोर्टच्या नावावर प्लॉटधारकांची ४१ लाख ५० हजारांनी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 14:41 IST

आरोपीविरुद्ध गुन्हा : पीडितांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे कागदपत्र जमा करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : पर्यटकांना रिसोर्टप्रमाणे कुटी भाड्याने देऊन दरमहा आर्थिक उत्पन्नाचे प्रलोभन दाखवत प्लॉटधारकांची ४१ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्सचा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भरत नानाजी धोटे असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी भरत धोटे (३८, रा. तुकूम) याने भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खासगी कंपनी स्थापन करून अभिकर्ते नियुक्त केले. त्यांच्या माध्यमातून पद्मापूर, अजयपूर, तळोधी (तुकूम), बोर्डा, किटाळी येथे कुट्यांचे बांधकाम केले. 

या कुटी युनिव्हर्स ॲग्रो टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करारनामा करण्याचे आमिष दाखविले. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांसाठी रिसोर्टप्रमाणे कुटी किरायाने देऊन प्रतिमाह ७ हजार ८३ रुपये देण्याचे प्रलोभन दाखवले. प्रत्येक गुंतवणूकदारांकडून २ लाख ५० हजार रुपये याप्रमाणे एकूण ४१ लाख ५० हजारांची आर्थिक फसवणूक केली.

याप्रकरणी सर्व अन्यायग्रस्तांतर्फे दाताळा म्हाडा कॉलनीचे रहिवासी अशोक भटवलकर यांच्या तक्रारीवरून भरत धोटे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणात आणखी काही आरोपी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. पीडित प्लॉटधारकांनी या संदर्भातील कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे जमा करावीत, असे आवाहन गुरुवारी (दि. ५) पोलिस प्रशासनाने केले. 

अशी केली फसवणूक चंद्रपूर आर्थिक गुन्हे शाखेचे पथक प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक बाबी पुढे आल्या. या तपासात आरोपी भरत धोटे याने भार्गवी लॅन्ड ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने खासगी कंपनी स्थापन करून किटाळी येथील डॉ. अमोल पोद्दार यांचे सव्र्व्हे क्र. ७६/३ आणि ७६/४ तसेच चांदा रयतवारी भूमापन क्र. ४१ ५/१ व ४१६ येथेही ले- आऊट तयार केले. प्लॉटच्या विक्रीकरिता ग्राहकांसोबत १०० रुपयांच्या स्टैंप पेपरवर विसारपत्र केल्याचे तपासात आढळून आले.

"संबंधित ले-आऊटमधील प्लॉट घेण्याकरिता विसारपत्र करणाऱ्या लोकांनी त्यांच्याजवळ असलेले संबंधित प्लॉटचे विसारपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे प्रकाशित झाल्यापासून आठ दिवसांच्या आत आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथे जमा करावे. या घटनेशी संबंधित सर्व माहिती तपासातून गोळा करणे सुरू आहे." - प्रभाकर चिकनकर, पोलिस उपनिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा

टॅग्स :fraudधोकेबाजीchandrapur-acचंद्रपूर