शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीने संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:58 IST

पंचायत समितीने बिरसा मुंडा सिंचन योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, विशेष केंद्रीय अर्थसहाय योजने अंतर्र्गत सिंदेवाही तालुक्यातील शेकडो लाभार्थी नियमानुसार पात्र ठरविण्यात आले.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : तत्काळ न्याय द्या

सिंदेवाही : पंचायत समितीने बिरसा मुंडा सिंचन योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, विशेष केंद्रीय अर्थसहाय योजने अंतर्र्गत सिंदेवाही तालुक्यातील शेकडो लाभार्थी नियमानुसार पात्र ठरविण्यात आले. असे असताना पंचायत समितीचे कृषी अधिकारी माटे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने त्रस्त झालेल्या शेकडो लाभार्थ्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना निवेदनासह माहिती दिली. प्रकरण गंभीर दिसताच कृषी अधिकारी माटे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तातडीने निलंबित करण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यानी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे गुरुवारी मोर्चा काढला.शेतकरी योजना, बिरसा मुंडा सिंचन योजना, डॉ. बाबासाहेब स्वावलंबन योजना, विशेष केंद्रीय अर्थसहाय योजना अंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील पात्र यादी बोलाविल्यानंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने सदर यादी मंजूर करून ती परत पंचायत समिती सिंदेवाहीकडे पाठविण्यात आले. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळण्यासाठी पुढील कार्यवाही पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांना करायची होती. मात्र त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणे सुरू केले. या योजनेअंतर्गत साहित्य खरेदी करण्याचे अधिकार शेतकऱ्यांना असतानासुध्दा कृषी अधिकारी माटे यांनी शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या घेऊ न स्वत: बँकेतून पैसे विडल केले. माटे यांनी ज्या दुकानातून साहित्य लाभार्थ्याना पाठविले होत, ते सुध्दा बोगस व निकृष्ट दर्जाचे होते. तसेच काही शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे विड्राल करूनसुध्दा त्यांचे बिल मंजूर करण्यास टाळाटाळ केली. विहिरीचे अनुदान मंजूर करताना चक्क लाभार्थ्यांकडून पैसे लुटण्यसाचा गोरखधंदा माटे यांनी सुरू केला. या सर्व प्रकारामुळे लाभार्थी असलेले शेतकरी त्रस्त झाले. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची तक्रार सर्वं विकास अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांच्यासाकडे केली. परंतु कोणतीच कार्यवाही होत नसल्यसाने या शेकडो त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन देऊ न सविस्तर माहिती दिली. या गंभीर प्रकरणाबाबत कृषी अधिकारी माटेवर तातडीने कारवाई करून निलंबित करण्याच्या मागणीसाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी लाभार्थ्यांच्या उपस्थितीत चक्क पोलीस स्टेशन सिंदेवाहीवर मोर्चा काढला. यावेळी पिडित लाभार्थी शेतकऱ्यांनी ठाणेदाराकडे लेखी तक्रार देऊ न लाभार्थी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबाबत तातडीने गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी तहसीलदार कुंभरे, इल्लूरवार संवर्ग विकास अधिकारी, रमाकांत लोघे, कविता कुटावार, विरेद्र जैस्वाल, अरूण कोलते, हरी बारेकर, गणेश गोलपल्लीवार, सचिन नाडमवार,स्वप्निल कावळे, रवी सावकुळे, सचिन दडमल, संजय गोबाडे, भूपेश लाखे, रोशन वारजूकर, राकेश कुंटावार, प्रवीण मोगरे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार