शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

चार नगर परिषदेत सभापतींची निवड

By admin | Updated: January 8, 2017 00:49 IST

जिल्ह्यातील वरोरा, बल्लारपूर, मूल, राजूरा या नगरपरिषदांमधील निवड शनिवारी झाली. त्यामध्ये विविध पक्षांच्या नगरसेवकांना संधी मिळाली आहे.

भाजपचे वर्चस्व : राजुरा, बल्लारपूर, मूल व वरोरा येथे निवडणूक चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा, बल्लारपूर, मूल, राजूरा या नगरपरिषदांमधील निवड शनिवारी झाली. त्यामध्ये विविध पक्षांच्या नगरसेवकांना संधी मिळाली आहे. वरोरा : नगरपरिषदेच्या विविध विषय समिची घोषणा शनिवारी करण्यात आली असून स्थायी समितीच्या पदसिध्द सभापतिपदी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली यांची व शिक्षण समितीचे पदसिध्द सभापती म्हणून उपनगराध्यक्ष अनिल झोटिंग यांची निवड करण्यात आली .बांधकाम समिती सभापती भाजपाचे अक्षय भिवदरे, नियोजन व विकास समिती सभापती - अनिल साखरिया, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती म्हणुन अपक्ष नगरसेवक शेख जैरुद्दीन छोटूभाई, पाणी पुरवठा समिती सभापती भाजपाच्या दीपाली टिपले, महिला व बालकल्याण समिती सभापती भाजपच्या ममता परसराम मरस्कोल्हे यांची निवड करण्यात आली. तर उपसभापती सरळ शामसुंदर तेला यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच स्थायी समिती सदस्य अक्षय भिवदरे, शेख जैरुद्दीन छोटूभाई , दीपाली टिपले, ममता मरस्कोल्हे, अनिल साकरिया, प्रदीप बुराण, दिलीप घोरपडे, गजानन मेश्राम आदींची निवड करण्यात आली. यावेळी पीठासिन आधिकारी म्हणून उपविभागीय आधिकारी प्रमोद भुसारी यांनी काम पाहिले. यावेळी मुख्य आधिकारीगिरीश बन्नोरे सर्व नगरसेवक तथा नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी )सर्वात कमी वयाचे सभापतीअवघ्या २३ वर्षांत नगर परिषद निवडणूक लढून त्यात भरघोस मताने निवडून येत अक्षय भिवदरे त्यांनी वरोरा नगर परिषदेत सर्वात कमी वयात निवडून येण्याचा बहुमान मिळवला होता शनिवारला त्यांची सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. मूल नगर परिषदेत सभापतींची निवडमूल : नगर परिषदेत शनिवारी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. त्यामध्ये उपाध्यक्षपदी नंदकिशोर रणदिवे, बांधकाम व नियोजन सभापतिपदी प्रशांत समर्थ, पाणीपुरवठा सभापती मिलिंद खोब्रागडे, शिक्षण व क्रीडा सभापती प्रशांत लाडवे, महिला व बालकल्याण सभापती शांता मांदाडे, महिला व बालकल्याण उपसभापतिपदी संगिता वाळके यांची निवड करण्यात आली. राजुरा नगर परिषदराजुरा : नगर परिषदेच्या सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांमधून पाच विभागासाठी पाच स्वतंत्र सभापतींची निवड प्रक्रिया अतिशय शांततेच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात शनिवारी पार पडली. त्यामध्ये बांधकाम सभापती आनंद दासरी, शिक्षण सभापती वज्रमाला बत्कमवार, महिला व बालकल्याण सभापती दीपा करमरकर, स्वच्छता व आरोग्य सभापती साधना भाके, नियोजन व पाणीपुरवठा सभापती पदसिद्ध उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पीठासीन अधिकारी बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी शाहुराज मोर यांनी काम पाहिले. नगर परिषद राजुराचे प्रभारी मुख्याधिकारी अमन मित्तल, नगराध्यक्ष अरूण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, नगरसेवक हरजित सिंह संधू, गजानन भटारकर, शारदा देविदास टिपले, गीता रोहने, संध्या चांदेकर यांच्यासह राजेंद्र डोहे, रमेश नळे आदी उपस्थित होते. बल्लारपूर नगर परिषदबल्लारपूर : नगर परिषद कार्यालयात विषय समित्यांच्या सभापतींची निवड शनिवारी करण्यात आली. त्यामध्ये शिक्षण सभापती जयश्री मोहुर्ले, स्वछता व सार्वजनिक आरोग्य सभापती महेंद्र ढोके, पाणीपुरवठा सभापती भावना गेडाम, नियोजन आणि विकास सभापती राकेश यादव, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा भटारकर, महिला व बालकल्याण उपसभापती पूनम निरंजने यांची निवड करण्यात आली आहे. सभेच्या पिठासीन अधिकारी गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व नगर पषिदेचे मुख्याधिकारी विपिन मुद्धा यांनी कामकाज पाहिले.