शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
9
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
10
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
11
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
12
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
13
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
14
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
15
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
16
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
17
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
18
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
19
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
20
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना

संपर्क तुटणाऱ्या गावांत चार महिन्यांचे धान्य पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:03 IST

दरवर्षी रस्ते व पूर परिस्थतीमुळे संपर्क तुटणाऱ्या जिल्ह्यातील १३ गावांना जिल्हा पुरवठा विभागाकडून एकाचवेळी चार महिन्यांचे धान्य पोहचविले जाते.

रस्ते व पूर परिस्थितीचा धसका : पुरवठा विभागाची सर्तकतालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दरवर्षी रस्ते व पूर परिस्थतीमुळे संपर्क तुटणाऱ्या जिल्ह्यातील १३ गावांना जिल्हा पुरवठा विभागाकडून एकाचवेळी चार महिन्यांचे धान्य पोहचविले जाते. यावर्षी ११ गावांना एकाच वेळी चार महिन्यांचे धान्य पुरवठा करण्यात आले असून उर्वरीत दोन गावांना लवकरच धान्य पुरवठा केला जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली आहे. संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटत असते. तर काही गावांत जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने वाहनाने धान्य पोहचविण्यात अडचणी येतात. त्यामुळे अशा गावांना एकाच वेळी चार महिन्यांचे धान्य पोहोचविले जाते. जिल्ह्यात अशी १४ गावे असून आतापर्यंत ११ गावांना चार महिन्यांचे धान्य पुरवठा करण्यात आले आहे. संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये चंद्रपूर तालुक्यातील वढा, आरवट, शिवणी चोर, पायली भटाळी, राजुरा तालुक्यातील कोलगाव, भद्रावती तालुक्यातील पारोधी, कोची घोनाड, गोंडपिंपरी तालुक्यातील कुलथा, पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव टोक, गंगापूर, ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, बल्लारपूर तालुक्यातील चारवट, हडस्ती कोरंबी गावांचा समावेश आहे. यापैकी भद्रावती तालुक्यातील पारोधी, कोची घोनाड या दोन गावांना धान्य पुरवठा झालेला नाही. येत्या दोन-चार दिवसांत या गावांनाही चार महिन्यांचे धान्य पुरवठा केला जाईल, असे पुरवठा विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांची धान्याची समस्या काही प्रमाणात दूर होणार आहे.१३ गावांतील ८ हजार ५३७ लाभार्थीपावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या १३ गावांची लोकसंख्या ८ हजार ५३७ असून या सर्व गावांत ३५० एपीएल शिधापत्रिकाधारक, ६२७ अंत्योदय तर १ हजार प्राधान्य कुटूंबाचे शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना १६७८ क्विंटल गहू तर १७५० क्विंटल तांदूळ असा ३४२९.३ क्विंटल धान्य पोहचविण्यात येणार आहे. यापैकी अर्ध्याहून अधिक धान्य पोहचविण्यात आले आहे.पूर परिस्थितीमुळे व रस्त्यांच्या दुरवस्थेने जिल्ह्यातील १३ गावांत धान्य पोहचविण्यात अडचणी येतात. त्यामुळे या गावांना एकाच वेळी चार महिन्यांचे धान्य पावसाळ्यापुर्वीच पोहचविले जाते. ११ गावांना धान्य पुरवठा करण्यात आले असून उर्वरीत गावत लवकरच धान्य पोहचणार. - आर. आर. मिस्कीन, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर.