शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चार आरोग्य केंद्रे रुग्णसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 05:00 IST

पालकमंत्र्यांनी कॅन्सरच्या वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली. प्राथमिक स्तरावर स्क्रिनिंग झाल्यास वेळेवर योग्य उपचार मिळून धोका टळतो. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कॅन्सरच्या निदानासाठी स्क्रिनिंग करावे, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या. तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसेल तर खासगी डॉक्टरांची सेवा शासकीय यंत्रणेत घेता येईल. तसा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठवावा.

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेतील राजुरा विधानसभा क्षेत्रातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मंगळवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे लाेकार्पण झाले. चार आरोग्य केंद्रांमध्ये नांदा (ता. कोरपना), भंगाराम-तळोधी (ता. गोंडपिपरी), विरुर स्टेशन (ता. राजुरा) आणि शेणगाव (ता. जिवती) चा समावेश आहे.  आणखी पाच नवीन आरोग्य केंद्रांच्या लोकार्पणाची तयारी सुरू आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रुग्णसेवा सुरू होत असल्याने दुर्गम भागातील नागरिकांची मोठी अडचण दूर होण्याची आशा निर्माण झाली. लाेकार्पण कार्यक्रमात कोरपना तालुक्यातील नांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातून आमदार सुभाष धोटे हे सुद्धा दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत उपस्थित होते.  या चारही आरोग्य केंद्रांत मॉड्युलर शस्त्रक्रिया विभागासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. जिल्ह्यात आरोग्य विभागात रिक्त पदांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे केली. कार्यक्रमाल अधिकारी, संबंधित प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, नर्स, लोकप्रतिनिधी व गावकरी उपस्थित होते.

आरोग्य केंद्र हे सेवेचे केंद्र व्हावे- विजय वडेट्टीवार - गोरगरीब जनतेसाठी शासकीय आरोग्य केंद्र हे आरोग्याचे मंदिर असते. वेदना घेऊन आलेला रुग्ण डॉक्टरांच्या उपचारानंतर बरा होत असला तरी त्याला मिळणाऱ्या चांगल्या वर्तणुकीने तो ५० टक्के आधीच बरा होऊ शकतो. त्यामुळे गरीब रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी हे सेवेचे केंद्र व्हावे, अशी आशा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे व्यक्त केली. 

कॅन्सरच्या निदानासाठी तत्काळ स्क्रिनिंग करा : आरोग्यमंत्री टोपे- पालकमंत्र्यांनी कॅन्सरच्या वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली. प्राथमिक स्तरावर स्क्रिनिंग झाल्यास वेळेवर योग्य उपचार मिळून धोका टळतो. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कॅन्सरच्या निदानासाठी स्क्रिनिंग करावे, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या. तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसेल तर खासगी डॉक्टरांची सेवा शासकीय यंत्रणेत घेता येईल. तसा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठवावा. जिल्ह्यात आणखी आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची मागणी करावी, अशी सूचना मंत्री टोपे यांनी केली.

राजुरा क्षेत्रातील रिक्तपदे भरा

आमदार सुभाष धोटे यांनी नांदा, प्राथमिक आरोग्य केंद्रातून दूरदृश्य प्रणालीव्दारे कार्यक्रमात सहभाग घेतला. राजुरा विधानसभा क्षेत्रातील आरोग्य विभागाच्या सर्व रिक्त जागा भराव्यात  मांडवा  व पाटण येथे आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत द्यावी यासह अनेक मागण्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केल्या.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल