शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पीएफचे पैसे स्वतःच्या खात्यात वळविणारे चार कर्मचारी बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 11:48 IST

जिल्हा परिषद : चौघांकडून पैसे वसूलीनंतर लगेच कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे लाखो रुपये स्वतःच्या बँक खात्यात वळविणाऱ्या तीन लेखापाल व कार्यक्रम सहायक, अशा चार कंत्राटी कर्मचाऱ्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी रविवारी (दि. ८) तडकाफडकी सेवेतून बडतर्फ केले. लेखापाल नामदेव येनूरकर, लेखापाल (अंकेक्षण) प्रवीण सातभाई, लेखापाल राकेश नाकाडे आणि कार्यक्रम सहायक प्रकाश मोहुर्ले, अशी बडतर्फ कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात शेकडो कंत्राटी कामगार काम करीत आहेत. त्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा करण्याची जबाबदारी लेखापाल नामदेव येनूरकर, लेखापाल (अंकेक्षण) प्रवीण सातभाई, लेखापाल राकेश नाकाडे आणि कार्यक्रम सहायक प्रकाश मोहुर्ले या कर्मचाऱ्यांकडे होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी नियमित जमा केला. मात्र, त्यानंतर घोळ करणे सुरू केले. या सर्वांनी ठरवून भविष्य निर्वाह निधीची रक्कम स्वतःच्या खात्यात वळती केली. या प्रकाराला सन २०२१-२२ मध्ये सुरुवात झाली. दोन वर्षे हा प्रकार सुरू होता. 

"जिल्हा परिषदेच्या लेखा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या तपासणीत चारही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खात्यात पैसे वळते केल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम त्यांच्याकडून वसूल करून सेवा समाप्त करण्यात आली. बडतर्फ कर्मचाऱ्यांचा कार्यभार त्याच विभागातील इतर कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे."-डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर