शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चार धरणे ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 23:01 IST

गतवर्षी कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. चंद्रपूरकरांची तहान भागविणाऱ्या इरई धरणातही पाणी साठा नसल्याने एप्रिल महिन्यापासून दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.

ठळक मुद्देसंततधार पाऊस : जिल्ह्यात आतापर्यंत ४७७ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षी कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला होता. चंद्रपूरकरांची तहान भागविणाऱ्या इरई धरणातही पाणी साठा नसल्याने एप्रिल महिन्यापासून दिवसाआड नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील अंमलनाला, पकडीगुड्डम, चंदई, लभानसराड ही चार धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर चारगाव, आसोलामेंढा, घोडाझरी, डोंगरगाव व इरई धरणात बऱ्यापैकी पाणी साठा जमा झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात ४७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.गतवर्षी जिल्ह्यात केवळ ५० ते ५५ टक्के पाऊस झाल्याने उन्हाळ्यात अनेक गाव व शहरांवर पाणी संकट ओढावले होते. यातच चंद्रपूर शहराची जीवनदायिनी असलेल्या इरई धरणाने तळ गाठल्याने एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. अनेक गावात व शहरात टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे जिल्हावासीयांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली होती.जून महिन्यात पावसाने हजेरी लावून नंतर हुलकावणी दिली. मात्र जुलै महिन्यात पावसाची चांगलीच बॅटींग सुरू असून अनेक भागातील जजजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे.काही ठिकाणी छोट्या-मोठ्या नाल्यांना पूर आला असून शेतपिकाचे नुकसान झाले आहे. पकडीगुड्डम, चंदई, अंमलनाला, लभानसराड या धरणाच्या वेस्टवेअरमधून पाणी ओसंडून वाहत आहे. तर इतरही प्रकल्प ५० टक्के वर भरले आहेत.कोरपना तालुक्यात सर्वाधिक ८१८.२६ मिमी पाऊसगेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात १ जून ते १० जुलैपर्यंत सरासरी ४७७ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. मागिल वर्षी १० जुलै पर्यंत सरासरी १५७.५८ मिमी पाऊस पडला होता. १० जुलैपर्यंत चंद्रपूर तालुक्यात ४१८ मिमी, बल्लारपूर ४३७ मिमी, गोंडपिपरी ४५५.६ मिमी, पोंभूर्णा ३८७.७ मिमी, मूल ५६४.६ मिमी, सावली ३९५.८ मिमी, वरोरा, ५५६.२४ मिमी, भद्रावती ५४२.३ मिमी, चिमूर ४८१ मिमी, ब्रम्हपूरी ३७३.६ मिमी, सिंदेवाही ४३०.८ मिमी, नागभीड ३२८.३ मिमी, राजुरा ४०४.५२ मिमी, कोरपना ८१८.२६ मिमी तर जिवती तालुक्यात ५६१.९ मिमी असे एकुण ४७७ मिमी पाऊस झाला असून सरासरी ४६.६ एवढी आहे.इरई धरणात २४.४८ टक्के जलसाठाचंद्रपूरकरांची तहाण भागविणाऱ्या इरई धरणातूनच वीज निर्मिती केंद्राला पाणी दिले जाते. परंतु, पाणीसाठा नसल्याने १५ जुलैपासून सीटीपीएसचा पाणी पुरवठा बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. तसे निर्देश देण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने बुधवारपर्यंत इरई धरणात २४.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर व वीज निर्मिती केंद्रावरील पाणी संकट काहीसे दूर झाले असून शहराला आता नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे.