शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधनासाठी नवविवाहितेकडून अघोरी पूजाप्रकरणी मांत्रिकासह चौघांविरुद्ध चंद्रपुरात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 10:50 IST

गुप्तधनासाठी नवविवाहितेकडून अघोरी पूजा करवून घेतल्याप्रकरणी मंत्रिकासह चौघांविरुद्ध वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनवरा, सासरा, सासूविरुद्ध गुन्हा दाखलकारेकर परिवार झाला बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: गुप्तधनासाठी नवविवाहितेकडून अघोरी पूजा करवून घेतल्याप्रकरणी मंत्रिकासह चौघांविरुद्ध वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नवविवाहितेचा पती समीर गुणवंत कारेकर, सासरा गुणवंत कारेकर, सासू विमलाबाई गुणवंत कारेकर व मांत्रिक अरुण दहेकर यांच्यावर भांदवी 498, जादूटोणाविरोधी कायदा कलम 2013 मधील कलम 2(1), 4, 5, 6, 3 शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारेकर परिवाराविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर हे कुटुंब बेपत्ता झाले आहे. काय आहे घटना?लग्न करून घरी आणलेल्या नववधूच्या अंगावरील हळद उतरत नाही तोच दुसऱ्याच दिवसापासून तिच्याकडून गुप्तधनाच्या प्राप्तीसाठी अघोरी कृत्य करायला लावल्याचा खळबळजनक प्रकार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उजेडात आणला होता. या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासू व सासºयावर जादुटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी पीडितासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मंगळवारी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे केली होती.पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीनुसार, चिमूर तालुक्यातील बिडकर येथील माजी जि.प. सभापती गुणवंत कारेकार यांचा मुलगा समीर कारेकार याने १९ ऑगस्ट २०१८ रोजी उच्चविद्याविभुषित सविता नामक युवतीशी विवाह करून घरी आणले. त्याचदिवशी सविताची आई घसरून पडली असता तिने सवितावर अवदसा, अपशकुणी असल्याचा ठपका ठेवला. यानंतर दुसºयाच दिवसापासून गुप्तधनाच्या लालसेपोटी पती, सासू व सासऱ्यांनी मिळून सविताला अघोरी पूजा करायला भाग पाडले. दररोज पहाटे ३ वाजता दर्गा पाण्याने धुवून स्वच्छ करणे. नंतर दर्ग्यामधील कासवाला पाण्याने आंघोळ घालणे. समीरच्या अंगात ताजुद्दीन बाबा येतो त्यावेळी तो शिवीगाळ व मारझोड करेल ते सहन करणे. कासवाची गंध, कुंकू, हळद लावून पूजा करणे, पूजा केल्यानंतर कासवाला दर्ग्याजवळ बसून एक-दीड किलो मुरमुरे खाऊ घालणे. हे करत असताना तिला दररोज मारझोड करायचा, असे तक्रारीत म्हटले आहे.दर्ग्यावर गुजगाव येथील महाराज येत असे. हा प्रकार पहाटे ३ ते दुपारी २.३० वाजतापर्यंत चालायचा. दरम्यानच्या काळात सविताला पाणी, चहा वा इतर कोणतेही अन्न खाऊ देत नव्हते. हा प्रकार दररोज चालायचा. या अघोरी कासव पुजेने पूजेत ठेवलेला चांदीचा नागोबा प्रसन्न होऊन गुप्तधन आपोआप वर येईल, असे सविताला सांगायचे, असेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये म्हणून सविताला तंबी देत जिवे मारण्याची धमकी दिली. यासह तिच्याजवळील मोबाईल फोनही हिसकावून घेतला. तिला माहेरीही जाऊ देत नव्हते, असे गंभीर आरोपही तक्रारीत आहे. तिने हा प्रकार तब्बल ५० दिवस सहन केला. सविताचे माहेर गडचिरोली जिल्ह्यातील आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तिला वडिलाने तिला माहेरी नेले. तिने सर्व प्रकार वडिलांना सांगितला. यानंतर राज्य महिला आयोग, वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मात्र काहीही उपयोग झाला नाही. अखेर तिने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी