शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

भाजपाचे चार, काँग्रेसचे पाच उमेदवार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:08 IST

नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण ४४५ अर्जाची उचल करण्यात आली. राजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर मतदारसंघातून एकूण सहा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आहे. एकूण १९९ व्यक्तींनी ४४५ अर्जाची उचल केली आली आहे.

ठळक मुद्देराजुरा-सुभाष धोटे, तर बल्लारपूरातून डॉ. विश्वास झाडे यांना काँग्रेसची तिकिट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपले चारही उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये राज्याचे हेवीवेट मंत्री सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), आमदार अ‍ॅड. संजय धोटे (राजुरा), आमदार नाना श्यामकुळे (चंद्रपूर) व आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया (चिमूर) यांचा समावेश आहे. काँग्रेसनेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी), डॉ. विश्वास झाडे (बल्लारपूर) तर प्रतिभा धानोरकर यांना वरोरा विधानसभेतून उमेदवारी जाहीर केली आहे. यातील आमदार विजय वडेट्टीवार व प्रतिभा धानोरकर यांनी आपले डमी नामांकन दाखल केले आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. कीर्तीकुमार भांगडिया यांना भाजपकडून तर आ. विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरीसाठी काँगे्रसकडून तिकीट मिळेल, हे निश्चित होते. किशोर जोरगेवार यांनी तिकिटासाठी दिल्लीला ठाण मांडून होते. राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर हेदेखील वरोरा विधानसभा क्षेत्रात आपल्या पत्नीला काँग्रेसची तिकीट मिळावी, यासाठी आग्रही होते. या दोघांनाही पक्षाने तिकीट दिली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून तथागत पेटकर (चंद्रपूर), गोदरू जुमनाके (राजुरा), चंद्रलाल मेश्राम (ब्रह्मपुरी), अरविंद सांदेकर (चिमूर), अ‍ॅड. अमोद बावणे (वरोरा) यांना रिंगणात उतरविले आहे. राकाँचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी मुंबईत शिवबंधन बांधले. वरोऱ्यातून शिवसेनेची उमेदवारी जाहीर न झाल्याने उत्सुकता ताणली जात आहे. चंद्रपुरात किशोर जोरगेवार यांच्या नावाला विरोध दर्शविण्यात येत असल्याने काँग्रेसने चंद्रपूरच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नसल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यात सहा अर्ज दाखलनामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एकूण ४४५ अर्जाची उचल करण्यात आली. राजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, चिमूर मतदारसंघातून एकूण सहा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आहे. एकूण १९९ व्यक्तींनी ४४५ अर्जाची उचल केली आली आहे. ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजय वडेट्टीवार, वरोरा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर व अशोक घोडमारे, चिमूर मतदारसंघातून वनिता राऊत व कैलास बोरकर यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019