शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-पैनगंगा नदी पात्रात आढळले स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:30 IST

Chandrapur : २५ हजार वर्षांपूर्वीचे जीवाश्म असल्याचा सुरेश चोपणे यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुमारे २५ हजार ते १२ हजार वर्षांदरम्यान विदर्भात लुप्त झालेल्या विशालकाय दुर्मीळ स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म चंद्रपूर तालुक्यातील वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात आढळले, असा दावा चंद्रपूरचे भूगर्भ अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी गुरुवारी (दि. १७) केला आहे. महाराष्ट्रात प्लेईस्टोसीन काळातील हत्तीचे मिळालेले हे दुर्मीळ जीवाश्म आहे. जीवाश्मसोबत पाषाणयुगीन अवजारेही मिळाली. दुर्मीळ हत्तींचे जीवाश्म व पाषाणयुगीन अवजारे एकाच ठिकाणी आढळणे, हे अतिशय महत्त्वाचे असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रातील ही जीवाश्मे प्लेईस्टोसीन काळातील आणि २५ हजार वर्षांदरम्यान विदर्भात वास्तव्य असलेल्या स्टेगोडॉन गणेश हत्तीचे आहेत. हत्तींच्या सुळ्यांवरून हे निरीक्षण विदेशी संशोधक व वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलाजीचे निवृत्त प्रा. अविनाश नंदा यांनी नोंदविले. हे हत्ती २३ ते २६ हजार वर्षांपूर्वी विलुप्त झाले. आजच्या आशियायी हत्तींचे हे पूर्वज होते. या ठिकाणी एलेफास नामाडिकस या लुप्त झालेल्या हत्तीचे सदृश डोकेसुद्धा आढळले.

या जीवाश्मांचे सखोल विश्लेषण करण्याची गरज आहे. प्लेईस्टोसीन २ लाख ते ११ हजार ७०० वर्षाच्या कालखंडात भारतात हत्तींचे व पाषाणयुगीन मानवाचे वास्तव्य होते. शेवटच्या कालखंडात हिमयुग होते. हे हिमयुग वितळल्यानंतर भारतात महापूर आला. त्यामुळे पुरातील गाळात सजीवांचे पुरावे सापडतात, असा दावा प्रा. चोपणे यांनी केला आहे.

यापूर्वी आढळलेले जीवाश्म२०२१-२२ मध्ये वरोरा तालुक्यातील वर्धा नदीपात्रात येलीफास नामाडिकस सदृश्य हत्तींची जीवाश्मे आढळली होती. वर्धा नदीवरील हे सर्वेक्षण २०२४ मध्ये पूर्ण झाले. आतापर्यंत आढळलेले सर्व जीवाश्म चंद्रपुरातील घरीच स्थापन केलेल्या रॉक म्युझियममध्ये ठेवली. राज्यातील भूगोल, भूशास्त्र, जीवशास्त्र व विज्ञान शाखेचे विद्यार्थी तसेच संशोधकांनी या जीवाश्मांचा अभ्यास करावा, असे आवाहन प्रा. चोपणे यांनी केले आहे.

"महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, पुणे व सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तसेच तेलंगणात आशियाई हत्तींची जीवाश्मे मिळाली. परंतु, स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्मे आढळण्याची महाराष्ट्रातील पहिली घटना आहे."- प्रा. सुरेश चोपणे, खगोल व भूगर्भअभ्यासक, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर