माजरी : वेकोलि माजरीच्या चारगाव साईडींगवर कोळसा भरत असताना कोळशाच्या डब्ब्यात आग लागली. कोळशाची वॅगेन ही आज बुधवारी माजरी रेल्वे जंक्शन येथे आल्यावर सकाळी १० वाजता स्टेशन मास्टर हरेंदरजित सिंग यांच्या लक्षात आली. त्यानंतर स्टेशन मास्टर यांनी त्वरित वेकोलि माजरीचे अग्निशमक पथक बोलावून आग विझविली. ही आग विझविण्याकरिता रेल्वेचे कर्मचारी अजयकुमार, रमेश राठोड, अग्निशमक विभागाचे राजेशसिंग, सरबजित सिंग यांनी मोलाची भूमिका बजावली. वॅगनमधील एकाच डब्ब्यातील कोळशाला आग लागल्यामुळे उर्वरित डब्बे वेगळे तात्काळ वेगळे करण्यात आले. स्टेशन मास्टर यांनी रेल्वे विद्युत बंद करुन अग्निशमकाच्या मदतीने आग विझविली. (वार्ताहर)
वॅगनमधील कोळशाला आग
By admin | Updated: November 3, 2016 02:16 IST