शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चारगाव खदान-माजरी मार्गावरील कोंढा पुलाची दैनावस्था

By admin | Updated: May 16, 2017 00:34 IST

कमीत कमी वाहतूक व जाण्या- येण्यासाठी असलेले कमी अंतर सुलभ होईल म्हणून माजरी- भद्रावती व परिसरातील नागरिकांनी पसंती दिलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कचारगाव: कमीत कमी वाहतूक व जाण्या- येण्यासाठी असलेले कमी अंतर सुलभ होईल म्हणून माजरी- भद्रावती व परिसरातील नागरिकांनी पसंती दिलेल्या चारगाव खदान ने माजरी मार्गावरील कोंढा पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र या पुलाची आता अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तो पूल अखेरच्या घटका मोजत आहे. याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने रोष व्यक्त होत आहे.भद्रावती- माजरी कोंढा मार्गे १५ ते १६ किलोमीटरचे अंतर आहे. मात्र या मार्गावर एम्टा खाणीची कोल सायडींग असल्याने सतत चालणारे व्हॉल्वो ट्रक, त्यामुळे उडणारी धूर व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था, यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडत आहे. यामुळे म्भद्रावती- माजरी या मार्गाने जाणारे नागरिक या मार्गाचा दुसरा पर्याय म्हणून भद्रावती- देऊळवाडा-माजरी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत.एकतर या मार्गाने जाण्यास जवळपास ९० किलोमीटरचे अंतर कमी होते. यामुळे या मार्गाचा वापर वाढला आहे. मात्र या मार्गावर देऊळवाडा - माजरीच्या मध्यंतरी कोंढा पूल आहे. उल्लेखनीय असे की काही वर्षापूर्वी या ठिकाणी पुल नव्हता. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या मागणीनंतर या नाल्यावर पूल बांधून दिला. मात्र, त्या नाल्यावरील पूर्वीच्या स्लॅबचे मोठे तुकडे व नाल्यात असणारे मोठमोठे दगड पडले आहेत. यातच रस्ता उंच आणि पुलाची उंची कमी, यामुळे थोड्या प्रमाणात पाऊस आला तरी पुलावरुन पाणी वाहू लागते व मार्गावरील वाहतूक ठप्प पडते. परिणामी सदर नाल्यावरील पुलाची उंची वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.त्यातच या मार्गावर डांबरीकरण काही वर्षापूर्वी करण्यात आले होते. मात्र ते डांबरीकरण हळूहळू निघू लागले आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या मधोमध अनेक एक फूट रुंद व सात- आठ मीटर लांबीपर्यंतच्या भेगा पडलेल्या आहेत. या मार्गावरुन भद्रावतीवरुन माजरी वा वणीला जाणारे नागरिक, खाण कर्मचारी, शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जाणे-येणे करतात. हा मार्ग लवकरात लवकर दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा हा मार्ग अपघातग्रस्त मार्ग म्हणून कुप्रसिध्द झाल्याशिवाय राहणार नाही.