शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांकडून भरून घेणार प्रपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:42 IST

भरघोस उत्पन्न मिळेल या आशेने बीटी कापूस बियाणे वापरणाºया शेतकºयांना यंदा बोंड अळीने हैराण केले.

ठळक मुद्देकपाशीला बोंडअळीचा विळखा : भरपाईसाठी करता येणार दावा

राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भरघोस उत्पन्न मिळेल या आशेने बीटी कापूस बियाणे वापरणाºया शेतकºयांना यंदा बोंड अळीने हैराण केले. जिल्ह्यातील कपाशीचे लागवड क्षेत्र वाढत असतानाच बोंड अळीने कपाशीवर आक्रमण केल्यावर नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी विभागाने शेतकºयांकडून आता प्रपत्र भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना या तालुक्यात यंदा कापसाचे लागवड क्षेत्र वाढले. धान उत्पादक म्हणून ओळखणाऱ्या ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल व सावली तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. जादा उत्पन्न मिळेल, या आशेने बीटी-२ या बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. मात्र, हे बियाणे यंदाच्या बदलत्या वातावरणात तग धरू शकले नाही. याचा जोरदार फटका कपाशीच्या उगवण क्षमतेवर झाला. शिवाय झाडाला बोंडे लागल्यानंतर गुलाबी बोंड अळीने विळखा घातला. त्यामुळे कपाशीचे बोंड काळपट झाले. यातून हेक्टरी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.राजुरा, कोरपना तालुक्यातील त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीच्या प्रार्दुभाव झाल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारींचा ओघ वाढतच असल्याचे सध्या दिसून येत आहे. या तक्रारीची दखल घेवून कृषी विभागाच्या तपासणी पथकाने शेतशिवाराची पाहणी सुरू केली. दरम्यान, बोंड अळीच्या तक्रारीची संख्या अधिक असल्याने आता प्रपत्र भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे.असे आहे प्रपत्रनमुना-जी नियम १२ (१) नुसार शेतकºयांकडून हे प्रपत्र भरून घेण्यात येणार आहे. बियाणे कुठून खरेदी केले, प्लॉट क्रमांक, किती एकरांत लागवड केली, उगवण क्षमता कशी होती, याची नोंदणी या प्रपत्रातून घेण्यात येणार आहे. या प्रपत्राला ‘चार-ए प्रपत्र’ असे नाव देण्यात आले आहे.प्रपत्रातून होणार नुकसानीचे मुल्यांकनगुलाबी बोंड अळीच्या नुकसानीसंदर्भात माहिती घेण्यासाठी तसेच पिकाचे मुल्यमापन करण्यासाठी या प्रपत्राद्वारे नुकसानीचा दावा करता येणार आहे. बीटी कंपनीने भरपाईसाठी नकार दिल्यास संबंधित शेतकºयाला न्यायालयात दाद मागता येणार आहे.सीसीआयचा आदेश धाब्यावरबीटी-२ तंत्रज्ञानाद्वारे निर्माण केलेल्या कपाशी बियाणे संदर्भात केंद्रीय कापूस संस्थेने (सीसीआय) डिसेंबर २०१५ ला मार्गदर्शक सूचना जारी केले होते. या सूचनेला अनुसरूनच बीटी बियाणे वापरत असताना खबरदारी घेण्याचे राज्य शासनाने मान्य केले. त्यानुसार एक आदेशही देण्यात आला होता. मात्र, या आदेशाचे पालन न झाल्याने कृषी व्यवसायिक व दलालांच्या मार्फतीने बीटी बियाणे शेतकºयांच्या माथी मारण्यात आले. त्यामुळे ही गुलाबी बोंड अळी शेतीच्या जीवावर उठली आहे.