ब्रम्हपुरी : वन विभागातील एकारा विश्रामगृह परिसरामध्ये मंगळवारी कार्यशाळा घेण्यात आली.
ब्रम्हपुरी वन विभागातील, उत्तर ब्रम्हपुरी, दक्षिण ब्रम्हपुरी वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते,
वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दररोज वनात खडतर सेवा करावी लागते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या जीवनात नेहमी ताणतणाव निर्माण होत असतो. व्यक्तिमत्व विकास व ताण-तणावाचे व्यवस्थापन या माध्यमातून एकारा येथे मंगळवारी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एच. ब्राम्हणे, वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एस. शहा व जयेश देशमुख उपस्थित होते. दैनंदिन कार्य करताना कर्मचाऱ्यांवर येणारा ताण, शिवाय जंगल भागात काम करताना जाणवणारा त्रास यातून अनेकदा जीवन कठीण होत असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे, यातून मुक्ती कशी मिळवावी, यासाठी ताण-तणाव व्यवस्थापनासंबंधी कर्मचाऱ्यांना चंद्रपूर वन प्रबोधनीमार्फत खडसे, प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनात वन विभागामध्ये सदर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.