शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाचे कार्य उत्तमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:15 IST

निसर्गाने ज्या परिसराला भरभरून दिले आहे, त्याचे सौंदर्य अधिक वाढवत ते स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनावे, यासाठी नवनवीन संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राबवित आहे.

ठळक मुद्देचंदनसिंह चंदेल : उथळपेठ येथे निसर्ग पर्यटन क्षेत्राचे लोकार्पण

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : निसर्गाने ज्या परिसराला भरभरून दिले आहे, त्याचे सौंदर्य अधिक वाढवत ते स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनावे, यासाठी नवनवीन संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राबवित आहे. इको पार्क ही त्यातील एक प्रमुख संकल्पना आहे. पर्यावरण संवर्धन, निसर्ग संवर्धनासाठी ते सतत प्रयत्नशील आहे. त्यांच्या विविध लोकहितकारी निर्णयामुळे दुर्लक्षित समजला जाणारा वनविभाग आता मुख्य प्रवाहात आला असून विभागाचे काम उत्तम आहे. लोकांच्या हृदयात विशेष स्थान वनविभागाने निर्माण केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.मूल तालुक्यातील उथळपेठ येथील श्री गायमुख देवस्थान या निसर्ग पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या इको पार्कच्या लोकार्पण सोहळयात चंदनसिंह चंदेल बोलत होते. ते पुढे म्हणाले, चंद्रपुरात बायपास मार्गावर वनविकास महामंडळाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम निसर्ग उद्यान ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जनतेच्या सेवेत रूजु झाले असून पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मूल शहरात पंडीत दीनदयाल उपाध्याय इको पार्क, पोंभुर्णा शहरात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क तयार करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी येथेसुध्दा त्यांच्या पुढाकाराने इको पार्कच्या निर्मितीला मंजुरी मिळाली आहे. या माध्यमातून निसर्ग पर्यटनाला त्यांनी चालना दिली आहे. निसर्ग पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून उथळपेठ गायमुख देवस्थान परिसरात तयार करण्यात आलेल्या इको पार्कमुळे या परिसराच्या वैभवात आणखी भर घातली जाणार असल्याचे चंदनसिंह चंदेल म्हणाले.यावेळी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्?थानी होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, मूल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, जि.प. सदस्य पृथ्वीराज अवताळे, मूल पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदू मारगोनवार, उथळपेठचे सरपंच रवंीद्र सातपुते आदींची उपस्थिती होती.परिसर झाला देखणाउथळपेठ येथील गायमुख देवस्थान पाण्याच्या कुंडाचे सौदर्यीकरण, गाय, बैल आदी प्राण्यांच्या तसेच गुराखी यांच्या प्रतिमा, विविध प्रजातींची लावण्यात आलेली रोपे, मुलांसाठी तयार करण्यात आलेले पार्क आदींच्या माध्यमातून हा परिसर अधिक देखणा करण्यात आलेला आहे.