शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच वनविभाग अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:40 IST

महाराष्ट्राच्या हरित सेनेत ५४ लाखांच्या वर सदस्यांची नोंदणी झाली असून ही जगातील सर्वात मोठी सेना ठरली आहे. वनेतर क्षेत्र वाढविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्राला रोजगार निर्मितीच्या क्षेत्रातील सुवर्ण पदकाने नुकतेच स्कॉच या संस्थेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : वन व सामाजिक वनीकरण कर्मचारी संघटनेचे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्राच्या हरित सेनेत ५४ लाखांच्या वर सदस्यांची नोंदणी झाली असून ही जगातील सर्वात मोठी सेना ठरली आहे. वनेतर क्षेत्र वाढविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्राला रोजगार निर्मितीच्या क्षेत्रातील सुवर्ण पदकाने नुकतेच स्कॉच या संस्थेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले आहे. आसामनंतर आता पोंभुर्णा येथे टूथपिकचे उत्पादन होणार आहे. वृक्षलागवड मोहिमेमध्येसुद्धा महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. असे प्रत्येक आघाडयांवर महाराष्ट्राचा वनविभाग अग्रेसर ठरला असून वनमंत्री म्हणून आपल्याला त्याचा अभिमान आहे. वनकर्मचारी व अधिकाºयांच्या परिश्रमांचे हे फलित असल्याचे कौतुकोद्गार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी नाटयगृहात आयोजित वनकर्मचाऱ्यांच्या चवथ्या राज्यस्तरीय अधिवेशनात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर पदमश्री डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, महापौर अंजली घोटेकर, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील अडगुरे, सरचिटणीस संतोष अतकरे, राजा आकाश आदींची उपस्थिती होती. या अधिवेशनाचे उदघाटन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वनकर्मचारी संघटनेच्या वतीने प्रकाशित दिनदर्शिकेचे विमोचन ना. मुनगंटीवार व डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रूपयांचा निधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुपुर्द केला. यावेळी बोलताना ज्येष्ठ समाजसेवक पदमश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी वनकर्मचारी संघटनेच्या कार्याची प्रशंसा करत त्यांचे कार्य इतर शासकीय कर्मचारी संघटनांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. वन व सामाजिक वनीकरण कार्यालय कर्मचारी संघटनेच्या वतीने ना.मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.वनकर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावावनांचे संवर्धन व संरक्षण तसेच वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे. हे कार्य वनकर्मचारी नेटाने व परिश्रमपूर्वक करीत आहेत. महाराष्ट्र वृक्ष लागवडीच्या क्षेत्रात अग्रणी ठरला आहे. याचे श्रेय वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमाला जाते. वनकर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत, असे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. संघटनेच्या वतीने ज्या मागण्या आज निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी आपण प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे ना.मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारforest departmentवनविभाग