शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

वन अकादमीमधून जिल्ह्यातील वनाचे वैभव वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर हा विपुल वनसंपत्तीने नटलेला जिल्हा आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र ...

ठळक मुद्देवनमंत्र्यांचा पुढाकार : देशातील दुसऱ्या क्रमांकाची वन अकादमी चंद्रपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर हा विपुल वनसंपत्तीने नटलेला जिल्हा आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र प्रकल्प जिल्ह्यात आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन खात्याचे मंत्रिपद स्वीकारताच चंद्रपूरच्या जंगलाचे वैभव आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पुढाकारातूनच चंद्रपूर देशातील दुसºया क्रमांकाची वन अकादमी उभारण्यात आली आहे. या वन अकादमीमधून वनाधिकारी, वन कर्मचारी सर्व बाजुंनी प्रशिक्षित होणार असून जिल्ह्यातील वनाचे वैभवही वाढणार आहे.उत्तर भारतामध्ये डेहराडूनला ज्या पध्दतीची आयएस झालेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षणाची सोय व सुविधा आहे, त्याच पध्दतीची वन कर्मचाऱ्यांसाठी सोयी व सुविधा असणारी प्रशिक्षण संस्था वन अकादमी म्हणून चंद्रपूरमध्ये उभी झाली आहे. चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचे वन अकादमीमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय ४ डिसेंबर २०१४ रोजी झाला. सदर संस्थेचे नामकरण चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रोबोधिनी (चंद्रपूर फॉरेस्ट अ‍ॅकेडमी आॅफ अ‍ॅडमिनीस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड मॅनेजमेंट) असे झाले. या वन अकादमीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार ठळकपणे दिसून येतो.वन खात्याची शिखर संस्थावन अकादमीची इमारत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम इमारत ठरली आहे. या अकादमीमध्ये दीर्घकालीन व्यवसायिक प्रशिक्षणासमवेतच विविध विकास प्रकल्पांचा पर्यावरणीय अभ्यास अहवाल तयार करून देण्यात येणार आहे. पर्यावरण क्षेत्रात संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे व जनजागृतीचे उपक्रम हाती घेणे, तसेच वनखात्याची शिखर संस्था म्हणून ही अकादमी काम करणार आहे. यामध्ये तांत्रिकी तसेच सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल.वन अकादमीत अशी होणार कामेवन अकादमी म्हणजेच वन प्रशिक्षण संस्था चंद्रपूर या प्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढवून राज्य वन अकादमीमध्ये रूपांतर करण्यात आले. ही संस्था वन विभागाची अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था असणार आहे. वन्यजीव व्यवस्थापन, वनापासून होणारे उत्पादन व वनांवर अवलंबून असणारी इतर कामे या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे.नैसर्गिक आपत्तीचे होणार निवारणचंद्रपुरातील वन अकादमी ही केवळ वनाधिकारी, वन कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचेच काम करणार नाही. तर जंगलातील वनसंपत्तीचे रक्षण व जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम ही संस्था करणार आहे. वन अकादमी संकुल परिसरात वन वणवा व नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्राची निर्मितीसुध्दा करण्यात येणार आहे. यामुळे चंद्रपूर वन अकादमी आपत्ती निवारणाच्या प्रक्रियेतील महत्वपूर्ण केंद्र म्हणून मान्यता प्राप्त ठरणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग