शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांपासून 'त्या' गावाला ग्रामपंचायतच नाही; कसा होणार गावाचा विकास ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:47 IST

कसा होणार विकास? : कथा सरडपार गावची, व्यथा ग्रामपंचायतीची !

राजकुमार चुनारकरलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : देशाच्या विकासाची सुरुवात गावखेड्यापासून होते. यासाठी ग्रामपंचायत पंचायतराज व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. ग्रामीण जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या योजना ग्रामपंचायतमार्फत नागरिकांना पुरविण्यात येतात तर गावातील तंटे, जन्ममृत्यू नोंदी, आरोग्य, शिक्षण या सुविधा ग्रामपंचायतमार्फत नागरिकांना दिल्या जातात. मात्र चिमूर तालुक्यातील सातशे लोकसंख्या असलेल्या सरडपार गावात मागील नऊ वर्षांपासून ग्रामपंचायतच नाही. 

त्यामुळे गावातील नागरिक ग्रामपंचायतसाठी नऊ वर्षांपासून शासन दरबारी पायपीट करीत आहेत. मात्र या बिना ग्रामपंचायतच्या गावाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधीचेही कमालीचे दुर्लक्ष केले आहे.

सरडपार गाव १९६२ ते २०१५ पर्यंत सरडपार गावची एक गटग्रामपंचायत होती. परंतु २०१५ मध्ये चिमूर नगर परिषद नवीन झाल्याने सरडपार गट ग्रामपंचायतमधील दोन गावे चिमूर नगर परिषदमध्ये समाविष्ट करण्यात आले व सरडपार गावाचे जास्त अंतर पडल्याने वाऱ्यावर सोडून दिले. २०१५ मध्ये सरडपार गाव जवळच्या ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट केले असते तर सरडपार गावाला नऊ वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून वंचित राहावे लागले नसते.

या संदर्भात गट विकास अधिकारी चिमूर, तहसील कार्यालय चिमूर, जिल्हा अधिकारी चंद्रपूर, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले असून मेलद्वारेसुद्धा कळविण्यात आले. तरी या गावाची दखल २०१५ पासून कोणी घेतली नाही. याचा त्रास सरडपार गाववासीयांना होत आहे. तसेच शासकीय कामासाठी लागणारे कागदपत्रे कार्यालय नसल्याने उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक योजनांपासून गावकरी वंचित झाले आहेत

गाव विकासापासून वंचितसरडपार येथे ग्रामपंचायतच नसल्याने हे गाव अनेक समस्यांच्या विळख्यात आहे. कारण विकास करण्यासाठी ग्रामपंचायतसारखे कुठले प्रशासनच नसल्याने नाले, रस्ते, स्वच्छता या सगळ्यांचे तीन तेरा वाजले आहेत. येथील नागरिक शासकीय योजनांपासून वंचित आहे. मुलांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो आहे. दाखला मिळण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागते. येथील नागरिक गेल्या नऊ वर्षांपासून टाहो फोडत आहे. मात्र शासन दरबारी त्यांचा आवाज अद्यापही पोहोचलेला नाही. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतchandrapur-acचंद्रपूर