शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

११० एकर शेतात फुलविले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:49 IST

सर्वाधिक संकटांचा सामना शेतकरीवर्ग करीत आहे. निसर्गावर अवलंबून असलेला हा बळीराजा निसर्गाच्याच दगाफटक्याने उद्ध्वस्त होत आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने येणाऱ्या संकटांशी झुंज देत शेतातच नंदनवन फुलविले आहे.

ठळक मुद्देचारगावातील शेतकऱ्यांची किमया : दुय्यम तुरीलाच केले मुख्य पीक

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वाधिक संकटांचा सामना शेतकरीवर्ग करीत आहे. निसर्गावर अवलंबून असलेला हा बळीराजा निसर्गाच्याच दगाफटक्याने उद्ध्वस्त होत आहे. मात्र वरोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने येणाऱ्या संकटांशी झुंज देत शेतातच नंदनवन फुलविले आहे. तूर या पिकालाच मुख्य पीक समजून त्याची विक्रमी लागवड करीत लाखोंचे उत्पन्न घेत त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्शच ठेवला.मधुकर भलमे हे अल्पभुधारक शेतकरी आहेत. वरोरा तालुक्यातील चारगाव (बु.) येथील ते रहिवासी आहेत. त्यांच्याकडे केवळ तीन एकर शेती आहे. त्यांनी दहा ते बारा वर्षांपूर्वी शेतात फळझाडांची व इतर पडित जागेवर विविध वृक्षांची लागवड करून उत्पन्न वाढविले होते. त्यानंतर त्यांचे शेतात नवीन प्रयोग करण्याचे धाडस वाढत गेले. हेक्टरी ३६ क्विंटल सोयाबीन पिकवून त्यांनी कृषी विभागाचेही लक्ष वेधले. त्यांनी नवनवीन प्रयोग करून यशस्वीही करून दाखविले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना शासनाने यापूर्वीच कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.एरवी इतर मुख्य पीक शेतात लावल्यानंतर पाळीवर किंवा बांधावर तुरीची लागवड करण्याची सर्वसाधारण पद्धत आहे. मात्र मधुकर भलमे यांनी तुरीचेच मुख्य पीक म्हणून लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रारंभी त्यांनी १० एकर शेती भाडेतत्वावर घेतली. त्यात त्यांनी तुरीचे भरघोष उत्पन्न घेतले. त्यानंतर त्यांनी ३० एकर, आणि आता ११० एकर शेती भाडेतत्वावर त्यांनी घेतली. त्यात केवळ तुरीचीच लागवड केली आहे. ११० एकर शेतातून ६०० ते ७०० क्विंटल तुरीचे उत्पादन होणार, अशी आशा भलमे यांना आहे.कृषी भूषण पुरस्कारमधुकर भलमे यांनी २००५ मध्ये केंद्र शासनाच्या पीक स्पर्धेत भाग घेतला होता. यात त्यांनी सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेऊन दाखविले होते. तेव्हा त्यांनी स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला होता. यासोबतच त्यांच्या यशस्वी प्रयोगाची दखल घेत २००८ मध्ये कृषी भूषण पुरस्कारही मिळाला.आपल्याकडे कोरडवाहू शेती अधिक आहे. उत्पन्न होत नाही, अशी शेतकऱ्यांची ओरड असते. मात्र आंतर पिकांवर अधिक जोर दिला तर नुकसान भरून काढता येते. मी तूर पीक लावले आहे. ७०० ते ७५० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. शेतकºयांनी ओरड करण्यापेक्षा शेतात नवनवीन प्रयोग करावे.- मधुकर भलमे, शेतकरी चारगाव (बु.)