शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अन्न सुरक्षा आर्मीचा पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 23:20 IST

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सीमेवर लढणारे सैनिक तांत्रिक, यांत्रिक आणि कल्पक दृष्टीने कायम सज्ज असतात. शेतीच्या संदर्भातील आवाहनेदेखील अनेक प्रकारची असतात. त्यामुळे सीमेवरील सैन्याप्रमाणेच सर्व आव्हानांना पेलणारी प्रशिक्षित अन्न सुरक्षा आर्मी तयार करुन त्यांच्यामार्फत नफ्यात चालणारी शेती करण्याचा पहिला पथदर्शी प्रकल्प चंद्रपूर व सिंधूदुर्ग जिल्ह्यात राबविण्याची शासन तयारी करीत आहे. राज्याचे ...

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : नव्या प्रयोगाची जाणून घेतली माहिती

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सीमेवर लढणारे सैनिक तांत्रिक, यांत्रिक आणि कल्पक दृष्टीने कायम सज्ज असतात. शेतीच्या संदर्भातील आवाहनेदेखील अनेक प्रकारची असतात. त्यामुळे सीमेवरील सैन्याप्रमाणेच सर्व आव्हानांना पेलणारी प्रशिक्षित अन्न सुरक्षा आर्मी तयार करुन त्यांच्यामार्फत नफ्यात चालणारी शेती करण्याचा पहिला पथदर्शी प्रकल्प चंद्रपूर व सिंधूदुर्ग जिल्ह्यात राबविण्याची शासन तयारी करीत आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शास्त्रज्ञांच्या या नव्या प्रयोगाची रविवारी चंद्रपूर येथे माहिती जाणून घेतली.येथील नियोजन भवन येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केरळ कृषी विद्यापीठाचे त्रिसूर संशोधन केंद्रातील सेवानिवृत्त कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. जयकुमारन यांनी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करुन उत्पादन वाढविण्यासाठी अन्न सुरक्षा सैन्यदलाची संकल्पना समजावून सांगितली. केरळमध्ये या पध्दतीचा प्रयोग करण्यात आला आहे. या संकल्पनेनुसार धानाची किंवा अन्य शेती करताना कमी वेळ, कमी खर्च आणि मोठया क्षेत्रावरील मशागतीला गती देता येते. या संकल्पनेनुसार धानाच्या प्रत्येक ४०० हेक्टर क्षेत्रामध्ये रोवणी यंत्रापासून कापणी यंत्रापर्यंत विविध यंत्रांचा वापर करण्यासाठी ५० उत्साही तरुणांना निवडून त्यांना सैन्यदलामध्ये देण्यात येणाऱ्या कडक व प्रगत प्रशिक्षणाप्रमाणे प्रशिक्षण देऊन त्यांची एक सुसज्ज तुकडी तयार करण्यात यावी, असे प्रस्तावित आहे. ही अन्न सुरक्षा आर्मी तयार झाल्यावर प्रत्यक्ष किमान ४०० हेक्टर शेतावर जावून रोवणीपासून कापणी व तणस व्यवस्थापनापर्यंत संबंधित शेतकºयांना मदत करेल. हा एक प्रशिक्षीत व्यवसाय असून या प्रशिक्षणाचा वापर ही आर्मी स्वत:च्या अर्थार्जनासोबतच अन्य शेतकºयांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी वापरतील. यावेळी केरळमध्ये महिलासुध्दा अनेक यंत्रांचा वापर करुन शेती करीत असल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. जय जवान जय किसान या घोषणेप्रमाणे प्रशिक्षित शेतकरी जवान व प्रत्यक्ष मेहनत करणारा शेतावरील शेतकरी या दोघांची परस्पर पुरकता वाढवून अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी संकल्प करण्याचा हा प्रयत्न आहे.सदर संकल्पना केरळ व अन्य काही ठिकाणी राबविण्यात आली आहे. या मागील अर्थकारण, व्यावसायिकता व उपयोगिता लक्षात घेऊन प्रथम काही भागात हा प्रयोग करण्याचा शास्त्राज्ञांचा सल्ला आहे. याबाबत चंद्रपूर व सिंधुदूर्ग या दोन जिल्ह्यामध्ये अशा पध्दतीच्या यांत्रिकीकरणाच्या शेतीला पुढाकार देता येऊ शकते काय, याबाबतची ही चाचपणी आहे. शेतीमध्ये प्रचंड मेहनतीसोबत आता कल्पकतासुध्दा महत्त्वाची आहे, असेही यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.