शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसही आता जिल्ह्यातून परतीच्या मार्गावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोरोनातून बरे झाल्यानंतर काहींना म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी हा जीवघेणा आजार होणाऱ्यांची संख्या वाढू ...

ठळक मुद्देरूग्णसंख्या घटली : ४५ रूग्णांवर शासकीय व खासगी रूग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनातून बरे झाल्यानंतर काहींना म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी हा जीवघेणा आजार होणाऱ्यांची संख्या वाढू लागली होती. मात्र आरोग्य यंत्रणेने प्रभावी पाऊल उचलल्याने कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसही जिल्ह्यातून परतीच्या मार्गावर लागला आहे. मार्च व एप्रिल महिन्यात ९५ रूग्ण होते. उपचारानंतर काहींना सुट्टी देण्यात आली. सध्या ४५ रूग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या आजारामुळे एकाचे डोळे काढावे लागले तर तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख कमालीचा घसरला आहे. मृत्यू रोखण्यात प्रशासनाला यश आले. मार्च व एप्रिल महिन्यात कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकरमायकोसिस हा आजार काहींना जडू लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. या आजारावरील उपचार व औषधी अत्यंत महाग असल्याने राज्य शासनाने महात्मा फुले आरोग्य विमा योजनेत समाविष्ट केला. रूग्णांची संख्या वाढत असताना एम्पोटीसिरीन-बी औषध चंद्रपुरातील कोणत्याही मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध नव्हते. त्यामुळे रूग्णांच्या कुटुंंबियांना धावाधाव करावा लागत होता. राज्य शासनाने हे इंजेक्शन पुरविण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे दिली. त्यामुळे रूग्णांच्या अडचणी दूर होऊ लागल्या. दरम्यान, कोरोना बाधितांची संख्याही कमी झाली. सद्यस्थितीत म्युकरमायकोसिसच्या ४५ रूग्णांची नोंद आरोग्य प्रशासनाकडे आहे. यापैकी तूकूम येथील क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये १४ रूग्ण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात पाच तर अन्य रूग्ण चंद्रपुरातील विविध खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.कोरोना रिकव्हरी रेट कमी झाला, मात्र संसर्ग अजूनही सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

म्युकरमायकोसिस प्राथमिक लक्षणेसायनसमध्ये नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत काळी बुरशी साठून राहते. नाकातून रक्त येऊ शकते. मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी होते. डबल व्हिजन म्हणजे एखादी गोष्ट दोन दिसून येते. रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना याचा त्रास होत नाही. मात्र, ज्या रूग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांच्यासाठी ही बुरशी प्राणघातक ठरू शकते.

अशी घ्या काळजीअनियंत्रित मधुमेह व स्टेराईडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये हा आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रूग्णांवर स्टेराईडचा वापर करताना काळजी घ्यावी. शरीरातील सारखेचे प्रमाण नियंत्रित ठेवावे. कोविड रूग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे आजारातून बरे झाल्यानंतर सकस आहार घ्यावा, असा सल्ला जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिला.

औषधींवर आरोग्य यंत्रणेचे नियंत्रणम्युकरमायकोसिस रूग्णांना इंजेक्शन व औषधी पुरवठा करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे दिली. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आले. मागणी नोंदविल्यानंतर उपलब्धतेनुसार इंजेक्शन थेट रूग्णांना पुरविले जात आहे.

तिघांचा मृत्यू ; एकाचा डोळा काढलाचंद्रपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस झालेल्या तिघांचा रूग्णांचा मृत्यू झाला तर एकाचा डोळा काढावा लागला. कोरोना बाधितांची संख्या कमी झाली. त्यामुळे म्युकरमायकोसिसही परतीच्या मार्गावर लागला आहे. मात्र हा आजार होऊ नये अथवा झाल्यास तातडीने उपचार करण्यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. 

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे सध्या ४५ रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इंजेक्शन व औषधांचा तुटवडा नाही. मात्र, मागणीनुसारच रूग्णांना उपलब्ध करून दिले जात आहे. कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाली. त्यामुळे म्युकरमायकोसिसही कमी होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, नागरिकांनी कोरोना संपला या मानसिकता न राहता स्वत:च्या आरोग्याची खबरदारी घ्यावी.-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या