शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नदी काठावरील जोखमीच्या गावांचा पूर ओसरतो, मात्र जखमा कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती समुद्रसपाटीची नसल्याने दरड कोसळण्याच्या घटनांची संख्या अत्यल्पच आहे. मात्र, इरई, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या प्रमुख नद्या आणि उपनद्यांना पूर आल्यास नदीकाठावरील गावांना दरवर्षी पुराचा जोरदार तडाखा बसतो. विशेषत: वैनगंगा नदी काठावरील अतिजोखमीच्या गावांची पावसाळ्यात कोंडी होते. 

ठळक मुद्दे८६ पूरग्रस्त गावांची व्यथा : नवीन सर्वंकष पुनर्वसन धोरणातून न्याय मिळेल काय?

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गत २० वर्षांच्या कालावधीत पुरामुळे गावांचे नुकसान होणे आणि दरड कोसळणे अशा संकटांमुळे जीवित व वित्तहानी झालेल्या अतिजोखमीच्या पूरपीडित गावांसाठी राज्य सरकार नवीन पुनर्वसन धोरण तयार करणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील पूरप्रवण ८६ गावांचाही पुनर्वसन व पायाभूत सुविधांच्या यादीत समावेश होणार काय, असा सवाल गावकऱ्यांनी ‘लोकमत’जवळ उपस्थित केला आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती समुद्रसपाटीची नसल्याने दरड कोसळण्याच्या घटनांची संख्या अत्यल्पच आहे. मात्र, इरई, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या प्रमुख नद्या आणि उपनद्यांना पूर आल्यास नदीकाठावरील गावांना दरवर्षी पुराचा जोरदार तडाखा बसतो. विशेषत: वैनगंगा नदी काठावरील अतिजोखमीच्या गावांची पावसाळ्यात कोंडी होते. पूरपीडित सर्वच गावांच्या पुनर्वसनाची आवश्यकता नाही, असे गावकऱ्यांचेच म्हणणे आहे. परंतु, पुरापासून बचाव करण्यासाठी पायाभूत सोईसुविधा मागील २० वर्षांच्या कालखंडात निर्माण होऊ शकल्या नाही. याची जबर किमत पूरपीडित गावांना मोजावी लागत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. घरांची पडझड होणे, पुरामुळे उभी पिके वाहून जाणे आणि हजारो हेक्टर शेतीची जमीन खरवडून निघणे या घटना आता दरवर्षीच घडू लागल्या आहेत, याबाबत गावकरी नाराज आहेत. मदत व पुनर्वसनमंत्री जिल्ह्याचेच असल्याने   राज्य शासनाकडून नवीन पुनर्वसन सर्वंकष धोरण तयार करताना जिल्ह्यातील पूरप्रवण ८६ गावांचा प्राधान्याने विचार झाला तरच हे नैसर्गिक संकट टळू शकते, अशी गावकऱ्यांची अपेक्षा  आहे.

जीवनवाहिनी वैनगंगा नदीचा सर्वाधिक फटका- वैनगंगा नदी ही विदर्भातील एक महत्त्वाची दक्षिणवाहिनी नदी आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांतून समुद्र सपाटीपासून ६४० मीटर उंचीवर झाला आहे. तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला ९८ किलोमीटरचा प्रवास करून भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांमधून वाहते. जीवनवाहिनी म्हणून ओळखणाºया वैगंगेला पूर आल्यास ब्रह्मपुरी तालुक्यातील नदी काठावरील गावांना सर्वाधिक फटका बसतो..

गतवर्षी ६७ गावांमधील शेती महापुराने केली उद्‌ध्वस्तn२०२० मध्ये मध्य प्रदेशातील धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीला महापूर आला होता. या पुराने ब्रह्मपुरी ३५, सावली ८, मूल ७, गोंडपिपरी १७ व पोंभुर्णा तालुक्यातील १० अशा एकूण ६७ गावांचे प्रचंड नुकसान झाले. ब्रह्मपुरी तालुक्ययातील लाडज, पिंपळगाव, अन्हेरगाव, भालेश्वर, चखलगाव, सौंद्री, हरदोली, सुरबोडी, सोनेगाव, बेलगाव, बेटाळा, पारधगाव, रणमोचन, खरकाळा, नांदगाव जानी, हल्दा, कोलारी, मालडोंगरी या गावांच्या जखमा तर अजूनही सुकल्या नाहीत.

पूरबाधित गावांची तीन श्रेणीमागील २० वर्षांत पूर आलेल्या गावांची यादी तयार करून स्थानांतरण, पुनर्वसन तसेच पायाभूत सुविधांबाबत नव्याने विचार केला जाणार आहे. या सर्वंकष पूनर्वसन धोरणासाठी जिल्हाधिकारी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन अशा पूरबाधित गावांची यादी निश्चित करतील. त्यामध्ये अति जोखमीची पहिल्या यादीत, मध्यम दुसऱ्या व कमी जोखमीच्या गावांची नावे तिसऱ्या यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर