ट्रॅॅक्टर जप्त : महसूल विभाग व पोलिसांची कारवाईवरोरा : गावातून अवैधरित्या रेतीची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करीत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. वारंवार ट्रॅक्टरधारकांना समजावून सांगितल्यानंतरही गावातील रस्त्यावररून रेतीच्या ट्रॅक्टरची वाहतूक बंद झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या वरोरा तालुक्यातील जामगाव (खु) येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता अवैध रेतीचे पाच ट्रॅक्टर पकडून पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना पाचारण केले. या पाचही ट्रॅक्टरधारकांवर पोलिसांनी कार्यवाही करून ट्रॅक्टर जप्त केल्याने अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्यांचे तुर्तास धाबे दणाणले आहे. वरोरा तालुक्यातील जामगाव (खु) गावानजीक एका नाल्यात रेतीसाठा आहे. या रेतीचा लिलाव झाला नाही. त्यामुळे या नाल्यातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जाते. ही वाहतूक गावातून केली जात असल्याने गावातील रस्ते खराब झाले व धुळीने ग्रामस्थ त्रस्त होते. वाहतूकी दरम्यान ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात असल्याने अपघाताची शक्यता बळावली होती. गावातून ट्रॅक्टरद्वारे रेती वाहतूक थांबविण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती.परंतु ट्रॅक्टरधारक ऐकत नव्हते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी सकाळी एमएच ३४ एल ३११०, एमएच ३४ एल २१६६, एमएच ३२ के ९६५२, एमएच ३४ एल ७२६७, एमएच ३४ एपी १६८९ या क्रमांकाचे पाच ट्रॅक्टर अडविले व पोलिसांना व महसूल अधिकाऱ्यांना पाचारण केले. पाचही ट्रॅक्टर पोलीस ठाण्यामध्ये लावून बालाजी महादेव पिंपळशेंडे महमंद पुंडलिक पेंदोर, उमेश सुरेश भोगेकर, गजानन बापुराव नैताम, महेंद्र प्रभाकर कोडापे यांच्याविरूद्ध सरपंच विजय कुरेकार यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. (तालुका प्रतिनिधी)वनविभागाने पकडले दोन ट्रॅक्टरवनपरिक्षेत्र वरोरा अंतर्गत येणाऱ्या सुर्ला बिटातील जंगलामधून अवैधरित्या उत्खनन करून रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर एमएच ३२ ए १७१, एमएच ३२ पी ३५ या क्रमांकाच्या दोन ट्रॅक्टरवर कार्यवाही करून वनविभागाने वाहन जप्त केले आहे. कार्यवाही वनपरिमंडळ अधिकारी बी.टी. लालसरे, लोणकर यांनी केली.