शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील बांधकाम कामगारांचे पाच हजार अनुदान बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 15:14 IST

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत असणाऱ्या कामगारांची अनुदानाची योजना शासनाने बंद केली आहे.

ठळक मुद्देबोगस कामगार नोंदीचा परिणाम खरे मजूर होणार वंचित

राजकुमार चुनारकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत असणाऱ्या कामगारांना मार्च २०१८ पासून अवजार खरेदी करण्याकरिता शासनाकडून पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत होते; परंतु यामध्ये अनेक कामगार बोगस असल्याच्या लेखी तक्रारी संबंधित मंत्रालय व शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने बांधकाम कामगारांची अनुदानाची योजना बंद केली आहे.शासनाच्या या निर्णयाने राज्यातील बांधकाम कामगारांमध्ये  खळबळ उडाली आहे. बोगस बांधकाम कामगारांवर कारवाई करा; परंतु योजना का बंद करता, अशा भावना बांधकाम कामगार व संघटनांमधून व्यक्त होत आहे. सध्या राज्यामध्ये शासनाच्या या कल्याणकारी मंडळाकडे २०,६७,७५८ बांधकाम कामगार नोंदणीकृत असून त्यापैकी आज अखेर पाच लाख आठ हजार ३७९ कामगारांनी पाच हजार अनुदान खरेदी करण्यासाठी मिळणाºया योजनेचा लाभ घेतला आहे. तर अद्यापही १५ लाख ५९ हजार ३७९ बांधकाम कामगारांना लाभ मिळालेला नाही.या मंडळाकडे बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी होते व लाभ घेतले जातात, अशा लेखी तक्रारी संबंधित आयुक्त मंत्रालयस्तरावर प्राप्त झाल्यानंतर नुकताच शासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील साडेपंधरा लाख बांधकाम कामगार पाच हजार रुपयांच्या अनुदान योजनेपासून वंचित राहणार आहेत.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे गवंडी, मिस्त्री, बिगारी, पेंटर, प्लम्बर, सुतार, सेंट्रिंगवाले, फिटिंग करणारे, अशा बांधकाम कामगारांची नोंदणी आहे; परंतु या नोंदणीमध्ये बोगस कामगारदेखील असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शासनाने तत्काळ निर्णय घेतल्याने प्रामाणिक व बांधकाम कामगार यांनादेखील पाच हजार रुपयाच्या अनुदानापासून दूर राहावे लागणार आहे.२०११ पर्यंत या मंडळाकडून कामगारांना कोणत्याही योजनेचा लाभ नव्हता. संघटनांच्या सततच्या आंदोलन व मोर्चानंतर शासनाने कामगारांना योजनांचा लाभ देण्यास सुरुवात केली. या मंडळाकडून बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना शालेय शिष्यवृत्ती आदी २३ विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो; परंतु पाच हजार रुपये अनुदान योजना बंद करून शासन बांधकाम कामगारांवर अन्याय करत आहे.बोगस कामगारांची जरूर चौकशी करा व दोषी असणाºयावर कारवाई करावी. पण थेट अनुदान योजना बंद करणे हा प्रकार चुकीचा आहे. मजुरांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न आहे. त्यामुळे अनुदान बंद निर्णयाचा पुनर्विचार करावा व मजुरांसाठी आरोग्य योजना सुरू करावी.-धनराज गेडाम,राज्याध्यक्ष, स्वराज्य बांधकाम कामगार संघटना.

टॅग्स :Governmentसरकार