शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

पाच हजार केशरी शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित

By admin | Updated: November 4, 2016 01:18 IST

महाराष्ट्र शासनाच्या अन्न पुरवठा विभागाने जानेवारी २०१५ पासून केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देणे बंद केले आहे.

सिंदेवाही : महाराष्ट्र शासनाच्या अन्न पुरवठा विभागाने जानेवारी २०१५ पासून केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देणे बंद केले आहे. त्यामुळे लाभार्थी नागरिकामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दोन रुपये किलो दराने गहू व तीन रुपये दराने तांदूळ दरमहा ३० किलो, पिवळ्या शिधापत्रीका धारकांना तांदूळ व गहू मिळून दरमहा ३० किलो तर केशरी शिधापत्रीकाधारकांना तांदूळ १० किलो व गहू १० किलो मिळून २० किलो धान्य मिळत होते.सद्यस्थितीत सिंदेवाही तालुक्यात सन २०१५ पासून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दोन रुपये दराने २० किलो गहू व तीन रुपये दराने १५ किलो तांदूर मिळून ३५ किलो धान्य वाटप केले जात आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी अंतर्गत शिधापत्रिकेत समाविष्ट असलेल्या प्रत्येक व्यक्तीला पाच किलो धान्य यामध्ये तीन किलो तांदूळ व दोन किलो गव्हाचा समावेश आहे. तर केशरी शिधापत्रिकाधारकांना जानेवारी २०१५ पासून स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण बंद करण्यात आले आहे. वास्तविक पाहता प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना २० किलो धान्य मिळावयास पाहिजे. सिंदेवाही तालुक्यात ९५ स्वस्त धान्य दुकाने आहेत. तसेच या तालुक्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची संख्या ४८ हजार २९९ तर अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ७ हजार ८३२ तर केशरी शिधापत्रिकाधारकांची संख्या पाच हजार ८५७ आहे. यामध्ये फक्त केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी या योजनेपासून वंचित झाले आहेत. दिपावलीसारख्या सणामध्ये केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य मिळू नये, याबद्दल केशरी शिधापत्रिकाधारकामध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न पुरवठा विभागाने केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा करावा, अशी लाभार्थी शिधापत्रिकाधारकांची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)