राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : पूर्व विदर्भात धान उत्पादन व त्यावर आधारीत राईसमील उद्योग हा प्रमुख व्यवसाय आहे. धानापासून तांदूळ तयार करताना लाखो टन कोंडा (टरफल) निघतो. कोंड्यापासून बायोमास पॉवर प्लांटद्वारे वीज निर्मिती केली जाते. मात्र, राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटची वीज खरेदी बंद केली. शिवाय, परवाना नुतनीकरणाला काही महिन्यांपूर्वी प्रतिबंध घातल्याने पाच जिल्ह्यातील सुमारे पाचलाख टन कोंडा पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहे.विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात सुमारे नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर सहा लाख शेतकरी दरवर्षी धानाची लागवड करतात. उन्हाळी हंगामातही साधारणत: ६० हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. दोन्ही हंगामातील धानाची एकूण लागवड लक्षात घेता ४० ते ४५ लाख टन उत्पादन होते. धानापासून सुमारे पाचलाख टन निघतो. कोंड्यापासून वीज निर्मिती केली जाते. पूर्व विदर्भातील मिलर्सच्या उत्पन्नाचा धान कोंडा हा मोठा भाग आहे. शेकडो राईसमीलचा बहुतांश खर्च कोंड्यापासून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातून भागविला जातो. पाच जिल्ह्यांमध्ये १० बायोमास पॉवर प्लांटद्वारे कार्यरत होते. यापूर्वी पॉवर प्लांट चालकांकडून ३ हजार ५०० प्रति टन दराने कोंड्याची खरेदी केली जात होती. मात्र, राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटकडून वीज खरेदी बंद केल्याने राईसमील व्यावसायिक संकटांचा सामना करीत आहेत.४० सहकारी तांदूळ उद्योग बंदसरकारचे पाठबळ नसल्याने आतापर्यंत विदर्भातील ४० सहकारी तांदूळ उद्योग बंद पडले. आता केवळ स्वबळावरच उद्योग सुरू आहेत. सरकारचे आयात-निर्यात धोरणातील जाचक अटींचा सामना करत असताना कोंड्याची दररोज विल्हेवाट लावणे कठीण झाले. पावसाळा सुरू झाल्याने राईसमील एकूण क्षमतेच्या केवळ २० टक्केच उत्पादन सुरू असल्याची माहिती राईस मील असोसिएशनने दिली.तीन राज्यांकडून घ्यावा बोधमध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याने राईसमील उद्योगाला सहकार्य करण्यासाठी कोंड्याला अधिक दर मिळवून दिला. त्यामुळे तेथील उद्योगधंदे व्यवस्थित सुरू आहेत. धान उत्पादनात अग्रेसर असलेल्या चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील उद्योग संकटात सापडले. या उद्योगावर सहा लाख शेतकरी, ५० हजार मजूर, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, उद्योजक अवलंबून आहेत.सरकारी धोरणांमुळे राईसमील उद्योग संकटात सापडले. यावर लाखो मजुरांचा रोजगार अवलंबून आहे. कोंड्याचे दर कमी झाल्याने किंवा मागणी घटल्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शेतकऱ्यांचेही नुकसान होते. धानाचे भाव कमालीचे घसरतात. त्यामुळे राज्य सरकारने बायोगॅस प्लांटचे नुतनीकरण करून राईसमील उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढावे.- जीवन कोंतमवार, राईसमील व्यावसायिक, मूल जि. चंद्रपूर.
विदर्भातील पाचलाख टन धानकोंडा सडण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 23:50 IST
राज्य शासनाने बायोमास पॉवर प्लांटची वीज खरेदी बंद केली. शिवाय, परवाना नुतनीकरणाला काही महिन्यांपूर्वी प्रतिबंध घातल्याने पाच जिल्ह्यातील सुमारे पाचलाख टन कोंडा पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहे.
विदर्भातील पाचलाख टन धानकोंडा सडण्याच्या मार्गावर
ठळक मुद्देबायोमास वीज प्रकल्पाकडून खरेदी बंदकोंड्याची विल्हेवाट लावताना राईसमील व्यावसायिक त्रस्त