शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पाच रुग्णालयांचे होणार विद्युत नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:07 IST

मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, नागभीड येथील ग्रामीण रुग्णालय आणि चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील विद्युत नुतनीकरणाचे काम रखडले होते.

ठळक मुद्दे२ कोटी २७ लाखांची तरतूद : रुग्णालयातील तांत्रिक अडचणी दूर होणार

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मागील काही वर्षांपासून जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, नागभीड येथील ग्रामीण रुग्णालय आणि चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील विद्युत नुतनीकरणाचे काम रखडले होते. त्यामुळे तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत होता. शासनाने २ कोटी २७ लाख १७ हजार ७७६ रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे ही कामे आता लवकरच मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, नागभीड आणि चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात विद्युतकरणाची कामे अर्धवट होते. त्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार सुरू आहे. अद्यावत आरोग्य सुविधा देत असताना विद्युत नुतनीकरण न झाल्याने विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. अतिशय जुनाट पद्धतीने वीज फिटिंग केल्याने आधुनिक सुविधा देणे कठिण झाले. या तालुक्यांतील नागरिक प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयावरच अवलंबून आहेत. त्यामुळे सुसज्ज वैद्यकिय सुविधा देण्यासाठी विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवणे गरजेचे होते. शासनाने ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयाची इमारत उभारली. मात्र विद्युत नुतनीकरण न झाल्याने आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाकडे लक्ष वेधले. आरोग्य सेवा संचालनालयाकडे तक्रार करून विद्युत नुतनीकरण करण्याची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती उभ्या करताना विद्युत नुतनीकरणाची शिफारस केली होती. परिणामी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांनी विद्युत नुतनीकरणासंदर्भात राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाने विद्युत नुतनीकरणाच्या कामाचे अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली. शिवाय २ कोटी १७ लाख १७ हजार ७७६ रुपयांना मंजुरी प्रदान केली. कामाची निविदा येत्या काही दिवसात काढण्यात येणार असून विद्युत नुतनीकरणाचे रखडलेले काम पुर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.वास्तु मांडणी आराखडासार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तूशास्त्रज्ञांकडून विद्युत नुतनीकरणाच्या कामाचे नकाशे तयार करण्यात येणार आहे. शिवाय वास्तु मांडणी आराखडा तयार करून त्याचे सादरीकरण केले जाईल. ह्या आराखड्याला वेगळ्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही. कामाच्या जागेची उपलब्धता, योग्यता याबाबतची खात्री ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांना करावी लागणार आहे.